सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा?


फडणवीस सरकार: सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा?
कॅगचा ठपका; शिवसेनेकडून न्यायालयीन चौकशीची मागणी


मुंबई/प्रतिनिधी
सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगने फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे. तर कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे भाजपच्यावतीने सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केले आहे.


फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालाने ठेवला आहे. कॅगच्या अहवालाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जर यामध्ये तथ्य असेल आणि कुणी घोटाळा केला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. यामध्ये तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती केली पाहिजे. मात्र सुतावरून स्वर्ग गाठायचा असे होता काम नये. संशय ठेऊ नका, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रभू म्हणाले की, कॅगने ज्या पद्धतीने फडणवीस सरकारवर सिडकोमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला आहे. असे असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने या अहवालात भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी. सरकारने सत्य समोर आणावं, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल, असे प्रभू यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा केल्याचा आरोप फडणवीस सत्तेत असताना कॉंग्रेसने केला होता. सिडकोच्या जमिनीची किंमत 1,767 कोटी रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली असल्याचा दावा देखील कॉंग्रेसने केला होता.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...