शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ



शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ


कामकाजाच्या दुसऱ्या दिवशीही भाजपाचा आक्रमक पवित्रा




 



 

मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपानं शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला.




शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार हे सराकरनं सांगावं, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. तसंच शेतकरी कर्जमाफीवरू त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावर स्थगन प्रस्तावावर विचार सुरू असून प्रश्नोत्तरांचा तास होऊ द्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भाजपानं आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी घोषणाबाजी भाजपाकडून करण्यात आली. विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळातच सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली.


यापूर्वी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनीदेखील सरकारची यादी फसवी असल्याचा आरोप केला होता. सरकारनं शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे. सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यांमधील अनेकांची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.


शेतकरी कर्जमाफीबद्दल आम्ही सरकारला विचारणा केली. त्यानंतर सोमवारी सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ही आकडेवारी फसवी आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे. ठाकरे सरकारकडून वचनपूर्वी झालेली नाही. सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही दरेकर म्हणाले.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...