करंजाडेवर सिडकोची 'आभाळमाया'
पनवेल संघर्ष समितीने सुचवलेल्या कामांना 33 कोटींचा 'हिरवा कंदील'
पनवेल: पनवेल शहराच्या दक्षिणेला वसलेल्या करंजाडे शहराला भलेही महापालिकेत समाविष्ट करून घेतले नसले तरी सिडकोने पायाभूत सुविधा आणि नियोजनाच्या अंगाने स्पर्श करत चक्क 33 कोटी 65 लाख रुपयांची थैली काही कामांसाठी देत हात सैल सोडले आहेत. याला निमित्त ठरली आहे, ती पनवेल संघर्ष समिती. समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी सुचवलेल्या कामांपैंकी 13 कामांना प्रशासकीय मंजुरी देत सिडकोने करंजाडेवर आभाळमाया दर्शविली आहे.
करंजाडे सेक्टर 6 मध्ये वाढीव कामांसाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात 10 कोटीच्या कामांचा समावेश आहे. त्यावर टिप्पणी करताना नवीन पनवेल सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनी स्पष्ट शब्दात नियोजन विभागाला अतिक्रमण आणि जुन्या कामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असेही सुचविले आहे.
सेक्टर 02, 3 ए, 4 व 5 मधील उर्वरित कामांसाठी 3 कोटी पन्नास लाख रूपये, भूखंड क्रमांक 7 ते 28 पर्यंतच्या झाकलेल्या गटारांच्या कामांसाठी 20 लाख, तसेच सेक्टर 23 मधील भूखंड क्रमांक 28 ते 32 आणि भूखंड क्रमांक 23 ते 27 ए करिता 25 लाख रुपये, सेक्टर 2 मधील झाकलेली गटारे जोडण्याकरिता 3 लाख रूपये, सेक्टर 1, 3 व 4 मध्ये नवीन गटारे बांधण्यासाठी 15 लाख रूपये, दोन बगीचे आणि एका मैदानासाठी तब्बल 5 कोटी रूपये देण्यात आले आहेत. करंजाडे शहरातील नागरिकांच्या वैकुंठधाम स्मशान भूमीसाठी सेक्टर 5 ए मध्ये 50.लाख रूपये देण्यात आले असून नियोजनकारांना त्यांचे संकल्पचित्र तयार करण्यास सुचविले आहे.
करंजाडे शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रूपये तर रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी चक्क 12 कोटी रूपये देताना सिडकोने हात सैल सोडले आहेत. शहराचा विकास साधताना मूळ गावालाही सिडकोने हात दिला आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी 30 लाख रुपयांचे गटार बांधायला सिडको राजी झाली आहे. गवळीपाडा येथील जोड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 6 लाख तर नाल्यावर लोखंडी सुरक्षा कठड्यासाठी 6 लाख रूपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे एकूण 32 कोटी 65 लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
विविध टप्प्यातील कामांना वेगवेगळ्या विभागाची मंजुरी मिळाली आहे. काही मंजुरी अंतिम टप्यात असून ही सर्व कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याची मुदत असल्याची तर काही कामांची निविदा प्रक्रिया येत्या एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती रोकडे यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली आहे.
शाळा इमारत आणि समाज मंदिराचे नियोजन
भूखंड क्रमांक 34 वर नियोजित समाजमंदिराचे बांधकाम आणि भूखंड क्रमांक 64 आणि 65 वर शाळा इमारत बांधण्याचे नियोजन असून त्या संदर्भात नियोजन, वास्तू विशारद आणि संकल्पचित्र तयार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. ते सुद्धा लवकरच पाठपुरावा करून पनवेल संघर्ष समिती सिडकोकडून काम करून घेईल, असे कांतीलाल कडू यांनी सांगितले आहे.
76 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या नव्या अध्यायाला प्रारंभ
गेल्याच आठवड्यात नवीन पनवेलमधील अंतर्गत रस्ते, गटार आणि फुटपाथसाठी 25 कोटी 50 लाख, कामोठे शहरातील रस्ते व गटारसाठी 10 कोटी आणि कळंबोलीतील रस्ते व गटारसाठी 8 कोटी रूपये असा 43 कोटी 50 लाख आणि आता करंजाडेसाठी 32 कोटी 65 लाख म्हणजे 76 कोटी 15 लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी नव्या अध्यायाला प्रारंभ केला आहे.
करंजाडेवर सिडकोची 'आभाळमाया'
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...