फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश
मुंबई/प्रतिनिधी
फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या सरकारच्या माध्यमातून कोणी किती झाडं लावली? त्यापैकी किती झाडं जगली? यांची सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्ष लागवडीच्या चौकशीची पहिल्यांदा मागणी केली होती, त्या मागणीनंतर प्रचंड खळबळ उडाली होती.
वृक्षाच्छादन तसंच रोजगार, उत्पन्न वृद्धीच्या भावनेतून फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. फडणवीस सरकारच्या काळात 50 कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी सुरु केलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या अभियानातून अपेक्षित काम झालं नसल्याची शंका महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी लेखी पत्रही दिले.
त्यानंतर विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना पाच वर्षांच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणी किती झाडं लावली, त्यापैकी किती झाडं जगली याची सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. फडणवीस सरकारने हे अभियान राबवलं त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते. त्यामुळे एकप्रकारने सुधीर मुनगंटीवार यांच्या महाअभियानाच्या कामकाजावरच संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वृक्ष लागवड झाली त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होती. वृक्षलागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...