भूतदया परमो धर्मा:


पनवेलमध्ये सामाजिक बांधिलकीतून श्‍वानांना लसीकरण
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल शहरात फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांबाबत सामाजिक बांधिलकी जपून काही संस्था व डॉक्टरांनी एकत्रित येवून या कुत्र्यांना झालेल्या विविध आजारांबाबत माहिती घेवून त्यांच्यावर लसीकरण केले. त्याचप्रमाणे श्‍वानांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर लावण्यात आले.
भटक्या कुत्र्यांना विविध प्रकारचे आजार जडलेले असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. अनेक वेळा त्यांच्या आजारपणाची लागण इतर कुत्र्यांना होते. अनेक जीव जंतू पसरून माणसांना सुद्धा त्याचा त्रास होवू शकतो. 
हे सर्व टाळण्यासाठी आज पनवेलमधील श्‍वान प्रेमी संघटना संस्थेने डॉक्टरांच्या मदतीने अशा भटक्या कुत्र्यांना लसीकरण केले. त्याचप्रमाणे रात्रीच्या काळोखात अनेक हे कुत्रे रस्त्यावर बसलेले असतात किंवा एखाद्या गल्लीत असतात. ते दिसत नसल्याने त्यांना रिफ्लेक्टीव्ह कॉलर गळ्यात अडकविण्यात आले.
यावेळी पनवेलमधील निता पर्वते, अर्चना कुळकर्णी, मनस्वी पावसे, अर्चिता कुळकर्णी, रुचा कदम, विक्रम काळे, शार्दुल लिमये, प्रथमेश दिक्षित, निखिल झाडे, अभिषेक, दिनेश मिश्रा आदींनी एकत्रित येवून सकाळपासून पनवेल शहरात फिरणार्‍या या भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर लसीकरण केले व त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टीव्ह कॉलर बसविली. 
यामुळे आगामी काळात विविध रोगांचा फैलाव होण्यास मज्जाव होणार आहे. तसेच या कुत्र्यांचे अपघात रात्रीच्या वेळेस टळणार आहेत.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...