बारावीतील नापासचा शेरा होणार गायब!

बारावीतील नापासचा शेरा होणार गायब!
मुंबई/प्रतिनिधी
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासचा शेरा काढून पुनर्परीक्षेसाठी पात्र किंवा कौशल्य विकासासाठी पात्र शेरे देण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवरून नापास/अनुत्तीर्ण शेरा याआधीच काढून टाकण्यात आला आहे. 
याचप्रमाणे कौशल्य विकास विभागाने 10 वी, 12 वीतील कौशल्य विकासासाठी पात्र असा शेरा मिळविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतू योजना आखली आहे. आता बारावीच्या गुणपत्रिकेवरही सुधारित शेरे असतील.
बारावीत नापास शेरा मिळाल्याने विद्यार्थी खचून जातात. काहींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने बारावीच्या गुणपत्रिकेवरही यापुढे नापास असा शेरा लागणार नाही, त्याऐवजी पुनर्परीक्षेसाठी ‘पात्र’ किंवा कौशल्य विकासासाठी पात्र असे सुधारित शेरे देण्याचा निर्णय जारी केला आहे. हे बदल यंदाच्या गुणपत्रिकेत दिसतील.
दरम्यान, बारावीत नापास शेरा मिळाल्याने विद्यार्थी खचून जातात. काहींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने बारावीच्या गुणपत्रिकेवरही यापुढे नापास असा शेरा लागणार नाही, त्याऐवजी पुनर्परीक्षेसाठी पात्र किंवा कौशल्य विकासासाठी पात्र असे सुधारित शेरे देण्याचा निर्णय जारी केला आहे. हे बदल यंदाच्या गुणपत्रिकेत दिसतील.


 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...