‘बायको देता का बायको’ चित्रपटाच्या अभिनेता आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण



‘बायको देता का बायको’ चित्रपटाच्या अभिनेता आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण


चित्रपट गृहासमोरच अज्ञात तरुणांकडून जीवघेणा हल्ला केला





‘बायको देता का बायको’ या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्याच बचावली.






बीड येथील आशा सिनेफ्लेक्स चित्रपट गृहात ‘बायको देता का बायको!’ सिनेमाचा शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आले होते. या दरम्यान, सिनेमागृहाच्या आवारात अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चित्रपट अभिनेते सुरेश ठाणगे व निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने बचावासाठी तेथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. हल्लेखोरांनी आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात फर्निचरची तोडफोडही केली, मारहाण कारणारे कोण होते याचा शोध घेतला जात आहे.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...