विराट कोहलीने दिले विश्रांतीचे संकेत 

विराट कोहलीने दिले विश्रांतीचे संकेत 
नवी दिल्ली/वृत्तसंस्था
भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुढील तीन वर्षांनंतर विराट आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत गांभीर्याने विचार करणार असून तीन पैकी एका प्रकारात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
२०२१ च्या टी २० विश्‍वचषक स्पर्धेनंतर तू क्रिकेटच्या एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा विचार करतो आहेस का? असा सवाल विराटला करण्यात आला. त्यावर विराट म्हणाला, सध्या तरी मी पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्वत:ला तयार करतो आहे. 
क्रिकेटच्या मैदानात आपण दमदार कामगिरी करत राहावी यासाठी मी सध्या केवळ पुढील तीन वर्षांचाच विचार करतो आहे. तीन वर्षानंतर मात्र कदाचित आपण काही वेगळ्या पद्धतीचा संवाद साधू शकतो. असा विषय तुम्ही कोणापासूनही लवपून ठेवण्यासारखा नाही. आता जवळपास गेले ८ वर्षे मी वर्षातील ३०० दिवस मैदानावर क्रिकेट खेळतो आहे.
त्यात प्रवास आणि सराव सत्रे देखील आलीच. आणि प्रत्येक वेळी मी माझे १०० टक्के प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकाची शारीरिक ताण सहन करण्याची एक मर्यादा असते.
त्यामुळे आता तरी मी तीन वर्षे तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे, पण नंतर मात्र कदाचित मी वेगळा निर्णय घेऊ शकतो. सहसा तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणार्‍यांच्या बाबतीत असे घडते. शारीरिक ताण आणि विश्रांती याबाबत खेळाडू कायम विचार करत असतात.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...