सफाळे, पारगाव, गिराळे स्मशानात कलाप्रदर्शन, शिबिराचे आयोजन 


सफाळे, पारगाव, गिराळे स्मशानात कलाप्रदर्शन, शिबिराचे आयोजन 
मुंबई/प्रतिनिधी
देह... ठरलं..,.
स्मशानात कलाप्रदर्शन, शिबिराचे आयोजन आणि सफाळे, पारगाव-गिराळे येथे कला शिबिराचे आयोजन मीमरा कलासंकुलने अर्थांत मीनाताई मधुकर राऊत कलासंकुल यांनी केले आहे, अशी माहिती आयबीएन 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी दै. निर्भीड लेखला दिली आहे.
तारीखः 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2020, ठिकाणीः निवासी कला शिबिर सफाळे, पारगाव, गिराळे.
निसर्ग रम्य परिस, चित्र, शिल्प, छायाचित्र यापैकी काहीही.   अनेक ज्येष्ठ कलाकारांचा सहवास व प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी. शुक्रवारी 21 फेब्रुवारीला संध्याकाळी चित्रकर्ती अमृता शेरगील विषयीचं प्रसिद्ध नाटक  तुझी आम्री. शनिवारी 22 फेब्रुवारीला संध्याकाळी आपट्याची पानं अभिवाचन, रविवारी 23 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता सांगता व चित्रप्रदर्शन उद्घाटन.
राहण्याची तसेच चहा, नाष्टा व शाकाहारी जेवणाची सोय आयोजकांकडून केली जाणार आहे. कला साहित्य कलाकाराने आणावयाचे आहे. कलाकृतीची मालकी कलाकाराचीच. शिबिरातील कलाकृतींची किमान दोन प्रदर्शने स्मशाभुमीवर करावयाचे आयोजन आहे.
कलाकाराने सांगितलेल्या किंमती इतक्या किंवा जास्त किंमतीत त्या कलाकाराची कलाकृती विकण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन आयोजकांनी दिले आहे.
 कलाकृती विकल्यास पन्नास टक्के रक्कम कलाकाराचीच आणि पन्नास टक्के आम्ही कलाहिताच्या व सार्वजनिक कामासाठी वापरणार. विकली न गेल्यास कलाकृती कलाकाराला कोणतेही शुल्क न आकारता परत करण्यात येईल, अशी सामाजिक भावनेतून स्पष्ट करण्यात आले आहे.
सहभागी कोण होऊ शकतोः कला विद्यार्थी, कलाकार व निमंत्रित कलाकार, कलाशिक्षक, नाममात्र शुल्क कलाकारांस 1,000 ( एक हजार रुपये व कलाविद्यार्थ्यांना 500 (पाचशे रुपये), कलासहित्य आपण आणावयाचे आहे.
हे कला शिबीर आयोजित करण्यामागचा उद्देशः देहदान व अवयवदान या विषयी जनमानसात जागृती व्हावी. कला व कलामुल्यांचा सामान्यजनांपर्यंत प्रसार व्हावा.
सहभागः जास्तीत जास्त जणांना सहभाग व्हावा, असा प्रयत्न अवश्य असेल. परंतु नियोजन सुलभतेसाठी सहभागी कलाकार व कला विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवणे भाग आहे. 
प्रथम नाव नोंदवून शुल्क 
भरणार्‍यांसाठी प्रथम प्राधान्य असेल. 
काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असेल.
 नाव नोंदणी व सहभाग शुल्क यासाठी पुढील पैकी कोणाशीही संपर्क साधू शकता.
अधिष्ठाता प्रा. विश्‍वनाथ साबळे, सर ज. जी. कला महाविद्यालय, प्रा. केशव कासार, ठाणे स्कूल ऑफ आर्ट, प्राचार्य अनिल अभंगे, चित्रकला महाविद्यालय, नाशिक, प्राचार्य सुरेेंद्र जगताप, जे. के. कला अकादमी, वडाळा, प्राचार्य राजेंद्र महाजन, ललित कला केंद्र, चोपडा, जिल्हा-जळगाव, प्राचार्या संगीता पाटील, विवा ईन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट, विरार पश्‍चिम, प्राचार्य विनय पाटील, डहाणू आर्ट कॉलेज, चित्रकार रवी मंडलीक, मुंबई, चित्रकार अजय देशपांडे, पुणे, मंगेश नाईक, नवी मुंबई, राजेश राजभर, मुंबई,  अशोक हिंगे, बदलापूर.
यजमानः आयबीएन-18 लोकमतचे संपादक, सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे असतील. आशुतोष राम आपटे,श्रीमती मधुमती कुलकर्णी, प्रा. यशवंत भावसार, महेेंद्र बोरसे व इतर, सफाळे. सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली थोडक्यात माहिती व आपला संपर्क क्रमांक ई-मेल करावा, संपर्कासाठी ई-मेलः ाशशाीरज्ञरश्ररीरपर्ज्ञीश्रसारळश्र.लेा  असे आवाहन करण्यात आले आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...