किवींच्या मार्‍यासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली


किवींच्या मार्‍यासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळली
 पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 122 धावा
 पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरचे सत्र वाया
 वेलिंग्टन/वृत्तसंस्था
 पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने 55 षटकांत 5 बाद 122 अशी मजल मारली आहे.  भारताच्या फलंदाजांना यावेळी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण या गोष्टीला अपवाद ठरला तो मराठमोळा अजिंक्य रहाणे. कारण भारतीय संघाची पडझड सुरु असताना त्याने एक बाजू लावून धरली. त्यामुळेच भारतीय संघावरील आपत्ती टळली. 
 अजिंक्यने यावेळी 122 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर सर्वाधिक नाबाद 38 धावांची खेळी साकारली. अजिंक्य खालोखाल सलामीवीर मयांक अगरवालच्या नावावर 34 धावा आहेत.
 भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. दुसर्‍या सत्राचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे तिसर्‍या सत्राच्या खेळाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही.
 पहिल्या सत्रात भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. दुसर्‍या सत्रातही भारताला दोन फलंदाज गमवावे लागले. पण मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मात्र भारताच डाव सावरला.
 भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात 28 षटकांत 3 बाद 79 अशी मजल मारली होती. दुसर्‍या सत्रातील सातव्या षटकातच भारताला सलामीवीर मयांक अगरवालच्या रुपात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हनुमा विहारीलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताला दुसर्‍या सत्राअखेरीस 55 षटकांत 5 बाद 122 अशी मजल मारता आली होती.
 न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त दोन धावाच करता आल्या. त्यामुळे धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के बसले. त्यामुळे पहिल्या डावातील 28 षटकांत भारताला उपहारापूर्वी 3 बाद 79 अशी मजल मारता आली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.
 
 
 
 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...