दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा पोहचला २० वर



दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा पोहचला २० वर


गोकुळपुरी भागात आजही आंदोलन, एक दुकानही पेटवलं




 



सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनातील मृतांचा आकडा आज २० वर पोहचला आहे. आज (बुधवार) सकाळी देखील दिल्लीतील गोकुळपुरी भागात हिंसक आंदोलनास सुरूवात झाली होती. या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका दुकानासही आग लावली.




ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर बेफाम दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये सशस्त्र हिंसाचार माजवला. या परिसरात अराजकतेने थैमान घातलेले पाहायला मिळाले. हिंसाचारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मंगळवारी संध्याकाळी मौजपूर, चाँदबाग, जाफराबाद आणि करवालनगर या अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सुरक्षेसाठी पाचही मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्यात आले आहेत. अन्य संवेदनशील भागांमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली असून सहा हजार पोलीस, शीघ्रकृती दलाचे जवान, निमलष्करी जवान तैनात केले आहेत.


दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी दिल्लीचे पोलीस प्रमुख अमूल्य पटनायक त्यांच्यासोबत होते.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...