कॉपी विरहित बारावीच्या परीक्षेसाठी भरारी पथके
2262 विद्यार्थी कर्जतमधून देतात बारावीची परीक्षा
कर्जत/प्रतिनिधी
उच्च माध्यमिक मंडळाची म्हणजे बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. 18) पासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यात तीन केंद्र ठेवण्यात आले असून त्या केंद्रावर 2262 विद्यार्थी यांनी परीक्षा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, परीक्षाकाळात केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली असून दुसरीकडे कॉपीविरहित परीक्षा पार पाडण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागात बारावी च्या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यात तीन कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र उघडण्यात आली आहेत.कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत असलेल्या केंद्रावर कला, वाणिज्य, विज्ञान आणि बँकिंग अशा विभागात 940 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. तर कर्जत परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी हे बारावीची परीक्षा अभिनव प्रशालेत असलेल्या केंद्रावर येऊन देत आहेत. तर नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षेचे केंद्र असून त्या ठिकाणी 815 विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, कॉम्पुटर सायन्स या विभागात बारावीची परीक्षा देत असून नेरळ परिसरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयमधील विद्यार्थी या केंद्रावर येऊन परीक्षा देत आहेत.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी कशेळे येथील भाऊसाहेब राऊत माध्यमिक विद्यालयात बारावी परीक्षेचे केंद्र बनविले आहे. त्या परीक्षा केंद्रावर प्रामुख्याने शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेणारे 50 टक्के विद्यार्थी परीक्षा देत आहेत. असे एकूण 2262 विद्यार्थी कर्जत तालुक्यातून बारावीची परीक्षा देत आहेत.
कर्जत शहरातील अभिनव प्रशाला,नेरळ येथील नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि कशेळे येथील भाऊसाहेब राऊत माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या तिन्ही परीक्षा केंद्रांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हे ठेवण्यात येत असलेल्या स्ट्रॉंग रूमला खडा पहारा पोलिस देत असून स्ट्रॉंग रूमवर रायगड पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर देखील 24 तास ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रायगड पोलिसचे उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिली आहे.
परीक्षा सुरू असताना कोणालाही मोबाईल फोन परीक्षा केंद्रांवर वापरण्यास बंदी असून परीक्षा केंद्रामध्ये देखील प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत.
कॉपी विरहित बारावीच्या परीक्षेसाठी भरारी पथके
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
सत्संग म्हणजे काय? ........................... - कांतीलाल कडू ............................ एकदा ब्रह्मश्री नारद भ्रमंती करत करत, नारायणाचा ज...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...