बेलपत्रांनी सजले विठुमाऊलीचे मंदिर
पंढरपूर/प्रतिनिधी
संपूर्ण देशात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीफचा उत्सव पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीफ मंदिरात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
संपूर्ण मंदिर महाशिवरात्री निमित्त आकर्षक फुलांनी सजवले आहे. महादेवाला प्रिय असलेल्या तब्बल 100 किलो बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदि ठिकाणी ही आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जाता.