रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत संघर्ष समितीची ‘कामसभा’


रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत संघर्ष समितीची ‘कामसभा’
पाणी, रस्ते, साकव, शाळा, पंचायत समिती इमारतीविषयी बैठकीत सकारात्मक चर्चा
पनवेल: पनवेल तालुक्यातील गाव, खेडे, वाड्या, पाडे पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याने ग्रामीण भागातील जनतेला रस्ते आणि पिण्यासाठी पाणी मिळावे, या अनुषंगाने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या मागणीनुसार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता दिलीप हळदे यांच्यासोबत पनवेल पंचायत समितीमध्ये मकामसभाफ आयोजित केली होती. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत अनेक प्रश्‍नांना स्पर्श करून त्यातून मार्ग काढण्यात आला.
आमसभेत विविध विभागाच्या अधिकार्‍यांची दांडी, आळशी आणि कामचुकार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि राज्य शासनाच्या एकतर्फी आदेशामुळे पनवेल तालुक्यातील समस्या मआफ वासून उभ्या आहेत. पनवेल ग्रामीण भागाचा खुंटलेला विकास पाहून पनवेल संघर्ष समितीने चिंता व्यक्त केली. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना पनवेल येथे बैठक घेण्याची विनंती केली त्यानुसार आज पनवेलच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीला अतिरिक्त मुख्य अधिकारी रणधीर सोमवंशी, गटविकास अधिकारी डी. टी. तेटगुरे, मुख्य अभियंता के. ए. बारदेस्कर, शाखा अभियंता संदेश पाटील, गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे आदी जण उपस्थित होते.
2012 पासून अर्धवट अवस्थेत राहिलेली पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, राज्य सरकारने भूसंपादन न करता लादलेला नैना प्रकल्प, एमएसआरडीसीने 1% गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणून लादलेली परवानगीसाठीची सक्ती, शांती निकेतन शाळा प्रशासनाची मूजोरी, प्रत्येक गावात पाणी योजनेचा वजलेला बौर्‍या, कागदावर पाणी योजना राबवून ठेकेदार आणि अधिकार्‍यांनी केलेला त्या योजनेचा बट्ट्याबोळ आदी विषयी गरमागरम चर्चा झाली.
विंधन विहिरी, बोअर वेल आणि तलाव हे पाण्यासाठी स्त्रोत असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पनवेल तालुक्यातील पाण्याची समस्या अतिशय गंभीर असल्याचे कडू यांनी काही उपस्थित ग्रामस्थांच्या मते अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. उपस्थित महिलांनी पाणी प्रश्नी अधिक आक्रमक होऊन पाणी योजनेचा मुखवटा उतरवला.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाची बोअरवेल योजना तोकडी असल्याने दहा कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्येक गावात पाणी योजना राबवण्याची ठोस मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
रिटघर-खानाव, दोधाणी- चिंचवाडी, नेरे पाडा जोड रस्ता, जाताडे जोड रस्ता, विंचूबे-उसर्ली, सांगाडे रस्ता, कष्टकरी नगर जोड रस्ता, दापिवली जोड रस्ता, कासारभट स्मशान भूमी रस्ता, डेरिवली ते पुढे, चिंचवण रस्ता, गूळसूंदे ते शंकर मंदिर रस्ता आदी रस्त्यांचे पूर्ण काम करण्याची गरज वर्तविण्यात आली.
याशिवाय वाकडी ते चिंचवली, दुदंरे, शिवणसई, आंबे तर्फे वाजे, रिटघर ते खानाव, शिवकर ते पाली रस्ता, महोदर पाली रस्ता, वावंजे ते प्राथमिक आरोग्य केंद्र रोड, वावंजे ते मानपाडा जोडरस्ता, आदई जोडरस्ता, नितळस जोड रस्ता, शांतीवन ते इजिमा जोडरस्ता, चिंचवली तर्फे वाजे जोडरस्ता, सांगटोली जोडरस्ता, धोदाणी जोडरस्ता, विंचूबे पूल व देवद जोड रस्ता, अजिवली जोडरस्ता, भिंगार भेरले कातकरवाडी जोडरस्ता, भिंगारवाडी जोड रस्ता, माची प्रबळगड जोड रस्ता, महालुंगी कातकरवाडी रस्ता, दुदंरेपाडा ते तामसई रस्ता, पनवेल वावंजे ते तळोजा एमआयडीसी रस्ता, कोलवाडी जोडरस्ता, सतीची वाडी जोडरस्ता, अकुर्ली रस्ता, वावंजे कातकरीवाडी रस्ता, विंचूबे उसर्ली रस्ता, चिपले बोनशेत रस्ता, कुंभटेकडी जोड मार्ग, उसर्ली बुद्रुक मार्ग, कोंड्याची वाडी जोड रस्ता आदी 46 रस्त्यांची कामे तर साकव आणि पुलाच्या कामासाठी वाकडी, चिंचवली तर्फे वाजे, दुदंरे, शिवणसई, आंबे तर्फे वाजे, रिटघर-खानाव, शिवकर पाली, महोदर कातकर वाडी, शांतीवन, तळोजा ते वावंजे एमआयडीसी मार्गाचा समावेश आहे.
याशिवाय कुंडेवहाळ, शिवकर पाली, पोयन्जे, गिरवले रस्ता, चावढोली, जांभिवली रस्ता, पारपुंड, आपटे कोरलवाडी, घेरा माणिक गड, कुडावे आदी रस्ते, साकव बांधण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्याचे ठरले. पनवेल संघर्ष समितीने पनवेल तालुक्यातील प्रत्येक गावाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला असून त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही बैठक त्याच्या नियोजनाचा एक भाग होता.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या शिष्टमंडळात सुभाषशेठ भोपी, मंगल भरवाड, अभिजीत पुळेकर, भास्कर भोईर, वामन शेळके, सचिन पाटील, मिलिंद पोपेटा, जयंतभाई मोटा, नारायण भोईर, भारत भोपी, दिपक पाटील, रामाश्री चौहान, तुळशीदास उसाटकर, धिरज भरवाड, कविता चौधरी, प्रियंका उसाटकर, रेखा चौधरी, पद्मिणी उसाटकर, संगिता उसाटकर, राजू भरवाड, बाळाराम पाटील यांचा समावेश होता.


 

 

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...