सचिनचा महाराजांना मानाचा मुजरा
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलं मराठीतून ट्विट
मुंबई/वृत्तसंस्था
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला.
अगदी कमी वयात त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवले. अशा शिवाजी महाराजांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे. प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणार्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा, असे सचिनने ट्विट केले आहे.
तसेच सचिनने श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. सर्व धर्मासंबंधी सहिष्णू भाव असल्याने राज्य मोठे होते अशी ही राजांची ठाम धारणा होती.
सचिनचा महाराजांना मानाचा मुजरा
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...