झाडांना बांधले शिवरायांंचे आज्ञापत्र
वृक्ष वाचविण्यासाठी सरसावले हिरवळ प्रतिष्ठान; रस्त्याच्या रुंदीकरणात दुतर्फा असलेली झाडे वाचविण्याचा दिला संदेश
पाली/प्रतिनिधी
ऐतिहासिक किल्ले रायगड सुशोभीकरण कार्यक्रम अंतर्गत कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. नाते खिंड महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या मार्गावर रुंदीकरणाचे वेगाने काम सुरू झाले आहे. मात्र हे काम सुरू करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली दीडशे वर्षांपूर्वीची व प्राचीन असलेल्या साधारणतः चार हजार झाडाची कत्तल करण्यात येणार असून काही झाडांची कत्तलही करण्यात आली आहे. याबाबत हिरवळ प्रतिष्ठान, विद्यार्थी, वृक्षप्रेमींनी यावर आक्षेप घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे.
आज शिवजयंतीच्या दिवशी पाचाड येथे हिरवळ प्रतिष्ठानतर्फे झाडांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र आणि वृक्षरक्षा बंधन बांधून वृक्षाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे. शिवजयंती निमित्त पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षप्रेमी, शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किल्ले रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत साडे सहाशे कोटीचे रायगड किंल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. यामध्ये महाड ते रायगड किल्ला या २४ किमी रस्त्याचे १३७ कोटीचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.
रायगड किल्ला पाहण्यासाठी लाखो शिवभक्त येत असल्याने महाड ते रायगड हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रायगड प्राधिकरण अंतर्गत घेण्यात आलेले आहे. रस्ता रुंदीकरण कामामध्ये दुतर्फा असलेली झाडे तोडली जाणार आहेत. हे काम सुरू झाले असताना काही झाडाची कत्तलही केली गेली आहे.
याबाबत वृक्षप्रेमीमध्ये नाराजी पसरली आहे. विकासाला आमचा विरोध नाही, विकास होणे गरजेचे आहे या मताशी वृक्षप्रेमी सहमत असले तरी वृक्ष तोडणे हे पर्यावरणाला घातक आहे अशी धारणा वृक्षप्रेमींची आहे. वृक्ष जतन करण्यासाठी आणि वृक्षाची कत्तल होऊ नये यासाठी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवजयंती दिवशी पाचाड येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र आणि वृक्ष बंधन बांधले आहे.
रस्ता रुंदीकरण करताना झाड वाचवा अशी भावना या वृक्षप्रेमींचे आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे शासन लक्ष देईल का? पर्यावरण प्रेमींची भावनेचा आदर करणार का? याकडे आता लक्ष लागले आहेत. यावेळी किशोर धारिया, शेखर गायकवाड, संतोष बुटाला, राजू मांडे, रघुवीर देशमुख आदींसह पर्यावरण प्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
झाडांना बांधले शिवरायांंचे आज्ञापत्र
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...