दुसरा ऑस्ट्रेलियन जावई



दुसरा ऑस्ट्रेलियन जावई, मॅक्सवेलने केला भारतीय तरूणीसोबत साखरपुडा


दोन वर्षांपासून करत होते डेट




 




वेगवान गोलंदाज पॅन कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मॅक्सवेलनं आपल्या साखरपुड्याची बातमी इन्स्टाग्रावरून दिली आहे. विशेष म्हणजे, मॅक्सवेल भारतीय वंशाच्या तरूणीसोबत लग्न करणार आहे. त्यामुळे मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलने बुधवारी भारतीय वंशाच्या विनी रमन या तरूणीशी साखरपुडा केला आहे.


मॅक्सवेलनं गर्लफ्रेंड विनी रमनला रिंग घालत लग्नाची मागणी केली. याबाबतची पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर करत विनीला आफला जोडीदार बनवल्याचं जाहीर केलं आहे. या पोस्टमध्ये विनी हातामधील रिंग दाखवत आहे. मॅक्सवेलनं फोटोच्या कॅप्शनमध्ये रिंगचा इमोजी टाकला आहे. दोघेही या फोटोत कमालीचे खूश दिसत आहेत.


क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही मॅक्सवेलचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या अधिकृत खात्यावरून दोघांचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मॅक्सवेल आणि विनी रमन मागील दोन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपून दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या.


मॅक्सवेल भारताचा दुसरा ऑस्ट्रेलियन जावई झाला आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय तरूणी मासूम सिंघासोबत लग्न केले आहे. दोघेही आयपीएल पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये होते.


दरम्यान, कोपऱ्याच्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सुरुवातीच्या काही सामन्यांतूनसुद्धा त्याला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून मॅक्सवेल या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केल्याने त्याला आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात पुन्हा स्थान देण्यात आले होते. पण दुखापतीमुळे आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही त्याला माघार घ्यावी लागली आहे.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...