जीवघेणा लोकलचा प्रवास
मुंबईच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा म्हणून उपनगरीय लोकलकडे पाहिले जाते. या लोकल सेवेत सुधारणा व्हाव्यात अशी मागणी सर्वचस्तरातून सातत्याने केली जात आहे. तथापि, मुंबईकर चाकरमान्यांच्या लोकलच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सातत्याने म्हणावे तितके लक्ष देत नाही.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवास करू इच्छिणार्या मूठभर व्यापार्यांच्या अथवा नवश्रीमंतांच्या सोयीसाठी अत्यंत महागडी बुलेट ट्रेन केंद्र सरकारला हवी आहे; परंतु मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करीत असलेल्या उपनगरीय लोकल सेवेकडे लक्ष द्यायला केंद्राला विशेषत: रेल्वे प्रशासनाला फुरसद नाही, असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासात भेडसावणार्या ज्या काही किमान सोयीसुविधांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे, तितकेही दिले जात नाही, हीच मुंबईकर रेल्वे प्रवाशांची खंत आहे. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करणारे हौशे, गवशे, नवशे कितीतरी आहेत; परंतु रेल्वे प्रवाशांचे नेमके दुःख समजून घेणारे फारच थोडे आहेत. खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना मुंबईकर प्रवाशांचा श्वास गुदमरतो. त्यात पंखे बंद नसले तर प्रवाशांचे होणारे हाल हे त्यांचे त्यांनाच माहित असतात. मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतागृहे हासुद्धा सातत्याने टीकेचा विषय होत असून त्यात काही सुधारणा होण्याचे नाव दिसत नाही. गलिच्छ आणि दुर्गंधीने युक्त अशी प्रसाधने हा किती काळ चर्चेचा विषय ठरणार, यासंदर्भात जबाबदार कुणाला धरणार? याबाबत ब्रह्मदेवालाही काही सांगता यायचे नाही, इतकी दुरवस्था रेल्वे स्थानकांची झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते.
रेल्वेस्थानकांमधील फेरीवाल्यांचा नाहक उपद्रव कधी थांबणार, याला काही अंतच नाही. मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानके फेरीवाल्यांनी आक्रमिली आहेत. त्यात बेशिस्त रिक्षा-टॅक्सीवाल्यांची अधिकच भर पडली आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव थांबणार कधी, या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागणार कधी, हा गहन प्रश्न सोडवावा, असे रेल्वे प्रशासनाला आणि संबंधित आरपीएफ आणि जीआरपी यंत्रणांना कधी वाटते की नाही? अरुंद जिने ही लोकल प्रवाशांची मुख्य तक्रार आहे ती दूर करण्यासाठी पादचारी पुलांची रुंदी वाढवण्याचे प्रयत्न अजूनही म्हणावे तितके वेगाने होताना दिसत नाहीत. परिणामी दादर, कुर्ला, वांद्रे यासारख्या विविध रेल्वेस्थानकांवर असलेल्या पुलांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे रेल्वेच्या पादचारी पुलांना जोडणारे जिनेसुध्दा अरुंद आहेत. या जिन्यांच्या पायर्या चढता आणि उतरताना प्रवाशांना चेंगराचेंगरीला, धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. यावरून प्रवाशांमध्ये भांडणे आणि हाणामार्या होण्याचे प्रकार घडतात. यावरून अरुंद जिने, अरुंद पूल यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात यावे.
रेल्वे प्रवाशांचा जिन्यावरून चढण्या-उतरण्याचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने मुंबईतील बहुसंख्य रेल्वे स्थानकांमध्ये सरकते जिने बसविले आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्टचीही सोय केली आहे. तथापि, या सोयीसुविधांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे म्हणावे तसे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही, हेच अंधेरी येथील घटनेवरून दिसून आले आहे.
जीवघेणा लोकलचा प्रवास
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...