भाजपा ‘ठाकरे सरकार’ला पकडणार कोंडीत



सावरकर ते एनपीआर…; भाजपा ‘ठाकरे सरकार’ला पकडणार कोंडीत


फडणवीस का म्हणाले, शरद पवार बुद्धिभेद करू पाहत आहेत?




 





सोमवारपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमधील मतभेद उघड होत असताना प्रमुखविरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, CAA, NPR याबाबत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.


अधिवेशनाच्या पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. “आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकणार आहोत असं सांगत फडणवीस म्हणाले, “२६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा सन्मान करणारा प्रस्ताव विधिमंडळात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवावा. आधीच सरकार मधल्या घटक पक्षांमध्ये संवाद व्हावा. विरोधकांना चहापानाला बोलावण्यात येतं ते संवाद घडवून आणण्यासाठी पण सरकारमध्ये सुसंवाद होताना दिसत नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केली.


“ही युती प्राकृतिक नाही. त्यांच्यामध्ये वैचारिक भिन्नता आहे. हे तिन्ही पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा NPR आणि CAA ला पाठिंबा आहे, तर काँग्रेसचा त्याला पूर्ण विरोध आहे. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका मात्र अद्याप समजू शकली नाही. यावरून या विषयावर तिन्ही पक्षांच्या तीन वेगळ्या भूमिका आहे ते स्पष्ट होतं,” असं फडणवीस म्हणाले.


फडणवीस का म्हणाले, शरद पवार बुद्धिभेद करू पाहत आहेत?


“NIA कडे अर्बन माओवादाचा तपास देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करणार आहे. त्यांनी स्वतः त्याबाबतचे पुरावे पाहिले असतील. त्याची व्याप्ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून, इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे. म्हणून याबाबत NIA तपासाची गरज आहे. CAA आणि NPR बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि स्वागत करतो,” असे फडणवीस म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलींच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याबाबत आरोप केले होते. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून त्यांच्या या विधानाला छेद मिळत आहे. त्यामुळे ते अशी विधान करून बुद्धिभेद करून दलित समाजामध्ये कॉन्फ्युजन निर्माण करू पाहता आहेत,” असं फडणवीस म्हणाले.




Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...