हाडांच्या आजारांवर दुर्लक्ष नको!
हृदयविकार, मधुमेह यांसारख्या प्रमुख आजारांच्या खांद्याला खांदा लावून जर आजकाल कोण वाटचाल करत असतील तर ते हाडांचे आजार आहेत. दर दहा रुग्णांमागे दोन-तीन रुग्ण तरी हाडांच्या साध्यांच्या तक्रारी घेऊन येतात. तीव्र वेदना कितीही उपचार घेतले तरी वेदना कमी होत नाहीत किंवा तात्पुरत्या कमी होतात, वेदनाशामके घेऊन जीव मेटाकुटीला आलेला, अतिप्रमाणात वेदानाशामके घेतल्याने वाढलेल्या पित्ताचा त्रास, किडनी आणि लिव्हरवर होणारे दुष्परिणाम अशा दृष्टचक्रात अडकलेले कितीतरी पेशंट असतात.
मुळात पंचेचाळीस किंवा पन्नाशीनंतर आपण हाडांच्या तक्रारी या सर्वसाधारण मानतो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजकाल तीस, पस्तीस, चाळीसच्या वयातच या समस्या सुरू झाल्या आहेत. कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी यांसारख्या सामान्य समस्यांपासून ते ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थायटीस, किफॉसिस, लारडॉसिससारखे थोडेसे जटिल असे हाडांचे विकार आजकाल तिशी-पस्तिशीतच गाठू पाहात आहेत. मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी सामान्यपणे सर्वत्र आढळणार्या समस्या आहेत.
वास्तविक आपली बदललेली जीवनशैली आणि बदललेले खाणपान याच्या मुळाशी आहेत. हालचालीचे कसरतीचे म्हणजेच शरीरिक श्रमाचे व्यवसाय तुलनेने कमी झाले आहेत. तासन्तास कॉम्प्युटर समोर बसल्याने, डोळ्यांबरोबर मानेचंही, दुखणं चालू होतं. दिवसभर एकाच ठिकाणी खुर्चीत बसल्याने, पाठदुखी कंबरदुखी उद्भवते. वरचेवर टू व्हीलरवर प्रवास केल्याने ही मान, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास वाढतो.
कॅल्शियमची कमतरता भासल्याने मणक्यांची झीज होणे, काही वेळेस चकती सरकते, नस दबली गेल्याने हाता-पायात मुंग्या येेऊ लागतात. मानेच्या मणक्यांमुळे हातात तर कमरेच्या मणक्यांमुळे पायात मुंग्या येत असतात, बर्याचदा हे पेशंटच्या लक्षात येत नाही.
सांधेदुखीच्या समस्येनेही अनेकजण त्रस्त आहेत. गुडघा, खांदा, मनगट, कोपर सांध्यांमधील लुब्रीकंट फ्लुईड म्हणजे एक प्रकारचं, वंगण कमी झाल्याने सांध्यांच्या हालचाली कठीण होऊ लागतात. गुडघ्याच्या वाटीची झीज होऊन किंवा वाटीवरील मऊ आवरणाला काही इजा होऊनही तीव्र गुडघेदुखी सुरू होते. रक्तामधील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने छोट्या सांध्यामध्ये सूज येऊन वेदना होऊ शकतात.
हाडांच्या आजारांवर दुर्लक्ष नको!
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...