कर्जतमध्ये ‘फिल्मी स्टाईल’ने अपहरण
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या आवळल्या मुसक्या
कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे रात्री साडे अकरा वाजता चार पांढर्या रंगाच्या गाड्यामधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. उल्हासनदीमध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलिस ठाण्यात येताच कर्जत पोलिसांनी दाखवलेली सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून सर्व अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात असून फिल्मी स्टाईलने अपहरण घटनेत वापरण्यात आलेल्या गाड्या देखील कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
गणेश अनंता घारे हे आपल्या मित्रांसह गुरुवारी (ता. २०) रात्री कर्जत सांगवी येथील उल्हासनदीमध्ये आपल्या दोन मित्रांसह गप्पा मारत बसले होते. अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गप्पा मारत असताना रात्री अकरा वाजताच्या दरम्यान तेथे नदीच्या बाजूला रस्त्यावर चार पाच पांढर्या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या.
त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले ते तिघेही पळून जाऊ लागले. मात्र गाड्यामधून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली. नंतर एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश घारे यांना पकडले. त्यानंतर त्यांना पकडून गाडीमध्ये टाकून त्या गाड्या कर्जतच्या दिशेने निघून गेल्या.
त्यावेळी गणेश घारे यांच्याबरोबर असलेले तरुण हे धावत सांगवी गावात पोहचले आणि तेथे घडलेली घटना गणेश घारे यांच्या घरी सांगितली. त्यानंतर अपहरण झालेले तरुण गणेश घारे यांचे बंधू योगेश अनंता घारे यांनी बारा वाजता कर्जत पोलिस ठाणे गाठले. तेथे कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे भावाचे अपहरण झाल्याची तक्रार केली. मात्र त्याचवेळी गणेश घारे यांच्या मोबाईलवर एक फोन आला आणि त्यांनी तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जत पोलिस नेरळ येथे पोहचले. पोलिस निरीक्षक भोर, पोलिस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहचले.
तेथे अपहरण करून आणलेला गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे बाहेरच्या खोलीमध्ये झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली हुंडाई वेरणा आणि इनोव्हा या दोन गाड्या तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणार्या अन्य पाच जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रीच कर्जत पोलिस ठाणे गाठले.
फिल्मीस्टाईलने करण्यात आलेल्या या अपहरण घटनेत गणेश घारे यांचे अपहरण केल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या गुन्ह्यात राजू बबन मरे ( वय ३९), भूषण विक्रमसिंग राजपूत (वय २४), निलेश बुधाजी मोरे (वय २७), शाहिद आलिम शेख (वय २३), लखन अशोक गायकवाड (वय २४), बाळाजी बबन पोल्ले (वय २९) यांच्यावर गुन्हा दाखल असून सर्वांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींना कर्जत न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या अपहरण घटनेने कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे. परंतु आर्थिक देवाणघेवाणमधून हे अपहरण नाट्य घडले असल्याची कुजबूज सुरू असून आर्थिक देवाणघेवाण वादाला अपहरण असे वळण लागले आहे, अशी चर्चा सुरू असून अपहरण नक्की कशासाठी याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कर्जतमध्ये ‘फिल्मी स्टाईल’ने अपहरण
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
सत्संग म्हणजे काय? ........................... - कांतीलाल कडू ............................ एकदा ब्रह्मश्री नारद भ्रमंती करत करत, नारायणाचा ज...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...