गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारताच हफ्तेखोऱ्यांनाही भरली धडकी!

संघर्ष समितीने पुन्हा लावला कारवाईसाठी ' धोशा'
..............................................
पनवेल: गुटखा विक्रेत्यांनाकडून हफ्ते वसुलीवर गुजराण करणाऱ्या पोलिसांपासून तथाकथितांचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने धाबे दणाणले आहेत. 'मी नाही त्यातली, अन कडी लावा आतली' , असे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकंही गुटखा विक्रीच्या हफ्तेखोरीवर व्हाईट कॉलरने जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ब्लँकमेलींग व्यवसायालाही सुरुंग लागणार आहे.
पनवेलसह सर्व शहरे आणि ग्रामीण भागात तसेच ढाब्यांवर असलेल्या टपऱ्या, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात शासनाने बंदी आणलेला पानमसाला, गुटखा आणि इतर तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजाराने विक्री होत आहे.
याबाबत पनवेल संघर्ष समितीने गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत बैठक घेवून पनवेलसह रायगडात करावाई करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिवाजी देशमुख, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्याकडे कारवाईसाठी तगादा लावला होता. रायगड प्रशासनाकडे अपुरे कर्मचारी बळ असल्याने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी देसाई यांना विनंती करून त्यांच्याकडील 18 कर्मचारी आणि अधिकारी रायगडच्या सात जणांच्या सोबतीला देवून पनवेल, विंचुबे, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आदी ठिकाणी सात पथकाने छापे टाकून साथ हजाराचा गुटखा जप्त केला.
त्यांच्या कारवाईनंतर गुटखा विक्रेत्यांना ब्लँकमेलींग करणाऱ्या तथाकथितांनी टोपी फिरवली आहे. नियमित हफ्ते घेणारे पोलिसही हात वर करून आमचा काही संबंध नाही असे सांगू लागले आहेत.
एका गुटखा विक्रेत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणतो, आमच्याकडून हफ्ते घेतलेल्यांनी त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, की आमचा गुटखा विक्रीशी काहीही संबंध नाही. अनेकांना मागतील तसे हफ्ते द्यावे लागतात, अशी खळबळजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
गुटखामुक्तीसाठी अन्न व औषध प्रशासनाने हत्यार उपसले असून टपरीधारकांना धडकी भरली आहे. तर कारवाईत नियमितता हवी, अशी मागणी दराडे यांच्याकडे कडू यांनी केली आहे.    


 

 

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...