कैलाश खेर यांच्या शिवस्तुतीवर डोनाल्ड ट्रम्प थिरकणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौर्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील मोटेरा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील. २५ फेब्रुवारीला ते भारतातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेर परफॉर्म करणार आहे.
या कार्यक्रमात कैलास खेर ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘जय-जय कारा, जय-जय कारा स्वामी देना साथ हमारा’ सादर करणार आहे. या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी कैलास खेर उत्साहित असल्याचे कैलास खेरने सांगितले.
याविषयी कैलास खेरकडून सांगण्यात आले की, ‘जय-जय कारा, जय-जय कारा स्वामी देना साथ हमारा’ या गाण्याने मी सुरुवात करणार आहे. यासोबतच ‘अगड़ बम-बम लहरी’ या गाण्याने माझ्या परफॉर्मन्सचा शेवट होणार आहे. माझ्या गाण्यावर ट्रम्प यांनी माझ्यासोबत ठेका धरावा, असे मला वाटत असल्याचे कैलास खेरने यावेळी सांगितले. चैतन्यमय अशा शिवस्तुतीने स्टेडियममधील वातावरण धुंद होईल. सर्वचजण ताल धरतील. त्याला ट्रम्पही साथ देतील, अशी आशा कैलास खेर याने व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नाव ‘नमस्ते ट्रम्प’ आहे. हा कार्यक्रम अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे आदरातिथ्य म्हणून आयोजित केला आहे. गुजरातमधील मोटेरा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मोटेरा येथील क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एक लाख प्रेक्षक बसू शकतात. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी या स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक लोक जमू शकतात. असा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात पुरुषांची समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या अनोख्या लव्हस्टोरीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केले आहे.
अमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या संकल्पनेची स्तुती केली. भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली. आता देशातील वैचारिकदृष्ट्या मागास लोकांचे प्रबोधन करण्यासाठी बॉलिवूडचा एक नवा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटात समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. अशा आशयाचे ट्विट पीटर टचल यांनी केलं होतं. हे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट’ असं म्हणत रिट्विट केलं आहे.