आकाशात तारे किती?


आकाशात तारे किती?
राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?
यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्‍या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला.
थोड्या वेळाने मोहर्‍या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, खाविंद, जेवढ्या मोहर्‍या या परातीत आहते, बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्‍या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्‍यांची संख्या समजेल.
यावर बादशहा म्हणाला, बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्‍या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही. 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...