राजकीय झुंडशाहीमुळे पनवेलचा कायदा व्यवस्था बिहारच्या उंबरठ्यावर?
पनवेल/प्रतिनिधी
पोलिस दलाचा अंकुश नसल्याने लेडीज बार, साधे बार पहाटेपर्यंत रंगत आहेत. काल, रात्री अडीच वाजता विश्राळी नाक्यावर असलेल्या महेश बारमध्ये भाजपाच्या एका नेत्याच्या उपस्थितीत त्याच्या सांगण्यावरून एका ग्राहकाला जोरदार ठोसा लगावल्याने त्याचा दात पडला. डोक्यावरही प्रहार दिल्याने तो इसम चांगलाच जखमी झाला. नियमांचे उल्लंघन करून पहाटे उशिरापर्यंत बारा सुरू असतात, या घटनेवरून त्याला पुष्टी मिळत आहे.
अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंदी असलेल्या राजकीय नेत्यांची पोलिस अधिकार्यांसोबत ऊठबस असल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होत नाही. त्याच संधीचा गैरफायदा घेत, पोलिसांना खिशात ठेवून गुन्हे घडवत आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळत आहे.
याचाच प्रत्यय देणारी आणखी एक घटना पनवेल शहरातील महेश बारमध्ये घडली काल रात्री चक्क अडीच वाजता म्हणजे कायद्याचे धिंडवडे काढत घडली.
विश्राळीनाका येथील महेश बारमध्ये काही ग्राहक मौजमजा लुटत असताना तिथे महापालिकेच्या राजकारणातील एक बडी व्यक्ती अंगरक्षकांसह रात्री अडीच वाजता आली. समोर बसलेल्या ग्राहकावर थेट हल्ला चढवून राडा केला. अतिशय शांत डोक्याने आणि पूर्वनियोजित कट रचून अंगरक्षकामार्फत नेत्याने त्याच्या उपस्थितीत हल्ला केल्याने बारमधील वातावरण तंग केले. या घटनेमुळे काही ग्राहकांनी तेथून पळ काढला.
कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देत भाजपा आमदारांच्या मुख्य कार्यकर्त्यांनीं पनवेलमध्ये बिहारी स्टाईलने राडे करून पोलिसांना आव्हान दिल्याने नागरिक मुठीत जीव धरून जगत आहेत.
या घटनेनंतर जखमी व्यक्ती पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेली. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढे काय झाले ते पोलिसांना ठावूक. इतक्या गंभीर गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात नसली तरी उपजिल्हा रुग्णालयात जखमीची नोंद आहे.