डोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात
ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी बनवण्यात आली आहे.
डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
३५ जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.
बराक ओबामा यांच्यासाठी सुद्धा केलं होतं डिझाइन
कुठल्या व्हीआयपीसाठी पाबुवाल यांनी पहिल्यांदा अशी खास क्रॉकरी डिझाइन केलेली नाही. यापूर्वी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी त्यांनी अशा प्लेटस बनवल्या आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप पासून ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेसाठी मुकूटही बनवण्याचा अनुभव त्यांच्याजवळ आहे.
शेवटच्या क्षणाला अमेरिकेची करारातून माघार
ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात विविध संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. पण व्यापारी करारावर एकमत व्हावे, यासाठी मागच्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या अधिकारीवर्गामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. भारताची काही मुद्दावर तयारी होती, पण अमेरिकेनेच शेवटच्या क्षणाला या करारातून माघार घेतली.