मैदानावर पाऊल ठेवताच न्यूझीलंडच्या रॉस टेलरचे ‘शतक’

मैदानावर पाऊल ठेवताच न्यूझीलंडच्या रॉस टेलरचे ‘शतक’
वेलिंग्टन/वृत्तसंस्था
 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला अखेरीस सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला कसोटी सामना असल्यामुळे या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचं ध्येय भारतीय संघासमोर असणार आहे. वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू रॉस टेलरने या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच शतकाची नोंद केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 सामने खेळणारा रॉस टेलर हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरलाय. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाहीये.
 दरम्यान, भारतीय संघात या सामन्यासाठी दोन महत्वाचे बदल करण्यात आले. रोहित शर्माच्या जागेवर मुंबईकर पृथ्वी शॉला संधी देण्यात आली. 
 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...