मालिकेचा शेवट बदलणार असल्याची केवळ अफवा: डॉ. अमोल कोल्हे
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. ही विनंती डॉ. अमोल कोल्हे यांनी स्विकारली अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
गेली दोन वर्षे मालिका सुरू आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
मालिकेत संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता यानंतरची दृश्ये पाहणे मनाला पटणारी नाहीत त्यामुळे ती दृश्य वगळण्याची विनंती त्यांनी केली होती.
मालिकेचा शेवट बदलणार असल्याची केवळ अफवा: डॉ. अमोल कोल्हे
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...