शरद पवारांची ‘गुगली’


शरद पवारांची ‘गुगली’
म्हणे, आता थांबायचं, तरूणांकडे पाहत राहायचं
कर्जत/प्रतिनिधी
राज्य 60 व्या वर्षांत पदार्पण करते आणि मी 80 व्या वर्षांत पदार्पण करतो. आता या वयात आपण थांबायचे, आता कसले व्हिजन बघत बसायचे. व्हिजन बघण्यासंबधीचे काम नव्या पिढीकडे द्यायचे आणि आपण बघत राहायचे त्यांच्याकडे. अलीकडे मी तेच काम करतोय, सुपुर्द केले आहे काम आणि त्यांच्याकडे मी बघत बसतो, काही अडचण आली, विचारले तर सांगायचे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यातून राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिल्याचे दिसत आहे.


लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणे योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचे व ते काय करतात हे पाहायचे, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असेही ते म्हणाले आहेत. 
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहत असतो, त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणे व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नसते, त्यामुळे तुमचा मान राहत नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे सांगत पवार म्हणाले, कॉंग्रेसमध्ये निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जावे लागते. शिवसेनेचे निर्णय मुंबईतच होतात. आज कॉंग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...