शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी



महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प: शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पेट्रोल-डिझेल 1 रुपयाने महागणार


 


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, महिला सुरक्षा आणि कोरोना व्हायरसवर उपायांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. याशिवाय सरकारने इंधनावरील कर वाढवल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर एक रुपयांनी वाढणार आहे.




यंदाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे

80 टक्के स्थानिकांच्या रोजगारासाठी कायदा करणार
उच्च तंत्रशिक्षणासाठी 1300 कोटी
क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा निधी
सर्व शाळांना इंटरनेटने जोडणार
आरोग्य विभासाठी 5 हजार कोटी
एसटीसाठी 1600 बस विकत घेणार
राज्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी
सरकारकडून शेतकऱ्यांना आधार
अल्पभूदारकांसाठीची योजना संपूर्ण राज्यात राबवणार
2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांचा निधी
क्रीडा संकुलासाटी 25 कोटींचा निधी
मुंबईत मराठी भवन बांधणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार
वरळीत पर्यटन संकुल उभारणार
आमदारांच्या विकासकांमांच्या निधीत वाढ

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...