‘जनता कर्फ्यू’चे आवाहन फाट्यावर


‘जनता कर्फ्यू’चे आवाहन फाट्यावर


जेएनपीटी प्रशासनाकडून राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन


ुउरण/प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्ट आणि सीएफएस तसेच यासंबंधी काम करणार्‍या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे विविध कामगारांच्या आरोग्याशी खेळणार्‍या खासगी तसेच केंद्रीय आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे नवघर विभाग अध्यक्ष वैभव भगत यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच संबंधित इतर विभागाशी पत्रव्यवहार करून केले आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्ट आणि सीएफएस तसेच यासंबंधी काम करणार्‍या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे विविध कामगार यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या खासगी तसेच केंद्रीय आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी कामगार वर्गांच्या जीवाशी, त्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा प्रकार खुले आम सुरु असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (ता. २२) केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमधील विविध कंपनी, आस्थापने यांनी प्रतिसाद न देता मोदी यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. 
कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाविषयी सर्व देशात विविध उपाययोजना चालू असताना जेएनपीटी प्रशासनाने आपले काम चालू ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे शिवाय कोरोना या रोगाविषयी जेएनपीटी प्रशासन व त्याच्याशी संबंधित यार्ड, आस्थापने, सीएफएस यांना या रोगाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे लक्षात येते यामुळे उरण मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार सर्व आस्थापने, यार्ड, कार्यालय यांच्यावर त्वरित व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे नवघर विभाग अध्यक्ष वैभव भगत यांनी केली आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या आजाराने भीतीचे वातावरण आहे. यावर खबरदारी म्हणून सर्वत्र उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या प्रशासनानेही वेळोवेळी आदेश जारी केले आहेत. त्याचं सामान्य नागरीक पालनही करत आहेत. प्रशासन आणि नागरिक दोघेही कोरोनाच्या संकटाशी चार हात करताना दिसत आहेत. 
मात्र उरण तालुक्यातील विशेषतः जवाहरलाल पोर्टच्या अखत्यारीतील चारही बंदरे (पोर्ट्स), त्यावर आधारित असणारी सारी कंटेनर फ्रेट स्टेशन, कस्टम हाऊस, जिथे शिपिंग एजेंट्स, ट्रान्स्पोर्टर, सर्वेयर यांची कार्यालये आहेत असे पीयुबी, फ्रेट फॉरवर्डर्स, अँकरेंज आदी ठिकाणी आजही कामे तशीच सुरू आहेत.  
जिथून आयात-निर्यात केली जाते, देशी-परदेशी जहाजांवर कंटेनर तसेच मालाची चढउतार दररोज  होत असते आणि  जिथून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे, अशी ठिकाणे आजही चालू आहेत.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...