थुंकणाऱ्या दीडशे जणांकडून सव्वा लाखाचा दंड वसूल
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या बेशिस्त मुंबईकरांकडून पालिकेने शनिवारी सव्वा लाखाचा दंड वसूल केला. एफ दक्षिण भागात सर्वाधिक ३३ जणांवर कारवाई केली आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. थुंकीतून सर्वाधिक प्रसार होत आहे. प्रशासनाने यामुळे स्वच्छतेवर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर बुधवारपासून कठोर कारवाई करत आहेत. शनिवारी चौथ्या दिवशीही तब्बल ११५ लोकांवर प्रशासनाने कारवाई केली. सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा दंड यावेळी वसूल केला. तर १४१ जणांना समज देऊन सोडून देण्यात आले. गेल्या चार दिवसांत ६९१ लोकांवर पालिकेने कारवाई करुन ६ लाख ९१ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, याआधी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारला जात होता. आता दंडाच्या रक्कम एक हजार रुपये केल्याने थुंकण्याचे प्रमाण कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
आजपर्यंत कारवाई
कारवाई - ६९१
दंड - ६९१०००
समज - ५७७