बिबट्याच्या वावरामुळे नौदल वसाहतीतील कामगारांमध्ये घबराट
उरण/प्रतिनिधी
उरणमधील नौदल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी शोध कार्याला सुरुवात केली असल्याची माहिती उरण वनक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांनी दिली. येथील नौदलाच्या शस्त्रसाठा असलेल्या परिसरात सात-आठ दिवसांपूर्वी पीएमसी जेट्टीजवळ गस्ती दरम्यान सुरक्षा जवानांना बिबट्या दृष्टीत पडला. त्यामुळे नागरिकांना सावधगिरीच्या सुचना नौदल विभागाचे डेप्युटी जनरल एस. के. शर्मा यांनी दिलेल्या आहेत.
याबाबत वन विभागाच्या अधिकार्यांना कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने बिबट्याचा शोध घेतल्यास सुरुवात केली आहे. शोध घेताना वन अधिकार्यांना पायाचे ठसेही आढळून आले आहेत. हे ठशांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान नौदल वसाहतीतील कामगारांसह मोरा, हनुमान कोळीवाडा, भवरा, बोरी- पाखाडी, केगाव आदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याच्या वावरामुळे नौदल वसाहतीतील कामगारांमध्ये घबराट
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...