नेरळ गावातील रस्ते ग्रामपंचायतीकडून निर्जंतुक


नेरळ गावातील रस्ते ग्रामपंचायतीकडून निर्जंतुक


तीन वेगवेगळ्या पथकांकडून फवारणी


ुकर्जत/प्रतिनिधी
जनता कर्फ्यूमुळे नेरळ गावातील सर्व रस्ते ओस पडले होते आणि त्याचा फायदा घेत कोरोना विषाणू यांचा संसर्ग रोखण्यासाठी कीटकनाशके यांची फवारणी करण्यात आली. नेरळ ग्रामपंचायतीकडे असलेल्या तीन फॉगिंग मशीनच्या माध्यमातून सर्व रस्त्यांवर ही फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, त्यात आता नेरळ गावात आज असलेल्या जनता कर्फ्यूमुळे सर्व लोक घरात बसले आहेत.त्यात रस्ते ओस पडले असल्याने त्याचा फायदा घेऊन जनतेला रोगमुक्त होण्यासाठी परिसर रोगमुक्त करण्याचे नियोजन नेरळ ग्रामपंचायतने केले होते.
त्यानुसार आज जनता कर्फ्यु सुरू झाल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाची तीन पथके ही कीटकनाशके फवारणी करण्यासाठी बाहेर पडली. त्यात ग्रामपंचायतीचे अव्वल कारकून मंगेश इरमाळी यांनी एक ट्रॅक्टर फॉगिंग मशीन तसेच अन्य दोन हँड फॉगिंग मशीन घेऊन ही सर्व पथके नेरळ गावातील सर्व रस्ते रोगमुक्त करण्यासाठी फवारणी करीत होते. काही काळ ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि सदस्य हे थांबले परंतु पोलिस प्रशासनाने कर्मचारी व्यतिरिक्त कोणालाही फवारणी पथकाबरोबर थांबू दिले नाही.
नेरळ ग्रामपंचायतीच्या फवारणी पथकात लक्ष्मण पवार, बाबू डबरे, सूर्यकांत ओव्हाळ, भगवान वाघ यांचे एक पथक तर दुसर्‍या गजानन मिरकुटे, आशिष तरे, गणेश जाधव, मुकुंद किर्ते यांचे दुसरे पथक तैनात करण्यात आले होते. 
तर ट्रॅॅक्टर फॉगिंग मशीन वर बाळाराम आढाव, राजेश वाघमारे, सूर्यकांत मिरकुटे आणि चालक गणेश चंचे यांच्या पथकाने शहर रोगमुक्त करण्यासाठी शहरातील रस्त्यावर फवारणी करून घेतली.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...