स्मशानातील भुतं स्मशानातच गाडू !
..........................
- कांतीलाल कडू
..........................
गाढवांना मोत्याचा चारा मिळू लागल्याने पत्रकारितेतही स्मशानातील भुतं आली आहेत. त्यांचा योग्य वेळी बंदोबस्त केला गेला नाही तर मानवीवस्तीचे स्मशान होण्यास वेळ लागणार नाही. असे असंतुष्ट आत्मे खुप आहेत. त्या भूतांचा उतारा आमच्याकडे आहे. स्मशानातील भुतं स्मशानात गाडण्यात आम्ही माहिर आहोत. दशमहाविद्येची कला चांगलीच अवगत असल्याने कुणाची दशा कधी आणि कशी करायची याचे चांगले ज्ञान ज्ञात आहे.
कांतीलाल प्रतिष्ठानचे कार्य जगजाहीर आहे. कुठल्या कंपनीतील काळ्या पैशाने किंवा सीएसआर फंड लपवून छपून वापरून सेवा केल्याचे मिरवणारे आम्ही नाहीत. आमचे जे काही चालते, कार्य करतो ते उघड्या छातीने. कुणाच्या छातीत, पोटात, पाठीत खंजीर खुपसून वार करून कोणते अभद्र धंदे करत नाहीत. स्वच्छ हेतू, प्रामाणिक विचार आणि पेरणीसुद्धा.
कोविडच्या परिस्थितीत सरकारी रुग्णवाहिका सोडल्या तर खासगी रुग्णवाहिका फक्त या परिसरात कांतीलाल प्रतिष्ठानची अहोरात्र सेवेत आहे. गेल्या आठ वर्षांपासून दोन रुग्णवाहिका गरीबांच्या सेवेत आहेत. अद्याप एकही तक्रार नाही. सर्वांना मोफत सेवा देण्याचे आम्ही कधीच सांगितले नाही. बेवारस मृतदेह मोफत नेतो... गरीब रुग्ण असतील मोफत सेवा... कोविड रुग्ण मोफत सेवा... कँसर रुग्ण ना नफा ना तोटा तत्वावर सुरू आहे. ते रुग्ण मुंबईतील टाटा, अंधेरी येथील रुग्णालयात घेऊन जावे लागतात. या सेवेची कुणी कधी शाबासकी दिलेली नाही, अपेक्षाही नाही. आज कुठे गेल्या राजकीय नेत्यांच्या रुग्णवाहिका? कुठल्या बिळात लपून बसलेत जनतेचे कैवारी? काही गाढवांना पैसे चारले की आपले कर्म झाकले जातात असा त्यांचा समज दिसतो. कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. त्यामुळे कुणी ही पत्रकारितेची 'वीणा' छेडली आहे ते बाहेर पडेल. पाण्यात घाण केली की ती तरंगते. त्यामुळे सकाळच्या पत्रकाराला सुपारी कुणी दिली हे सर्वांना माहीत आहे.
कोविडमध्ये आम्ही नागरिकांना देत असलेल्या सेवा आणि त्यातून समाजात होत असलेली प्रशंसा यातून पोटदुखी आणि ज्यांची ज्यांची बुडे आमच्या लेखणीने आतापर्यंत काळीनिळी केली आहेत, त्या नगरभक्षकांनी दावणीला बांधलेला सांड आमच्या अंगावर सोडला आहे. त्याला आता शिंगावर घ्यायलाच हवा. या पत्रकाराने आणि त्याच्या वर्तमानपत्राने गेल्या दोन तीन वर्षात आपल्या संस्थांनी केलेल्या नागरी कामांची एक तरी छापलेली सकारात्मक बातमी दाखवावी. कुणाच्या तरी पेरोलवर काम करणारी पत्रकारिता समाजाला कधीच न्याय मिळवून देत नसते. त्या पत्रकारितेचे स्वातंत्र्यही खुंट्याला बांधलेल्या गायीसारखे असते. गाय बांधलेली असते आणि समोर चारा टाकलेला असतो. पण खुंट्याला बांधलेल्या दोरामुळे तिचे स्वातंत्र्य मर्यादित असते, तशी पत्रकारिता बांधून ठेवलेली आहे. लोकांना कळत नाही असे अनेक महाभागांना वाटते. आज काही पत्रकारांनी नव्वदच्या दशकात मुंबईत उसळलेल्या गुन्हेगारी टोळ्यांसारखे साम्राज्य पसरवलेले आहे. ही पत्रकारिता आणि त्यांच्या टोळ्या सगळीकडे हात मारत सुटले आहेत. काही पत्रकारांना दारूसाठी इतके पैसे लागतात की, वर्षभर मानधनही वृत्तपत्र देत नाहीत किंवा जाहिरातीची वर्षभराची दलालीही मिळत नाही, तेवढा यांच्या महिनाभराच्या दारूवर खर्च होतो. मग हे बकरे शोधत असतात. त्यात सुपारी मिळाली की नागडे नाचतात... स्मशानातील भुतांसारखे. मग त्यांचा खेटराने उतारा काढावा लागतो कधी कधी.
सकाळचा झोलर पत्रकार हा घरीही कामाचा नाही आणि बाहेरही...! हा तळोजा एमआयडीसी, शासकीय कार्यालयात काळ्या यादीवर असलेला शार्पशूटर आहे. तो आपल्या नादाला कधीच लागला नाही. अधून मधून फोन करून शेपटीचा गोंडा फुलवत दादा, दादा करत असतो. दादा हे विचारायचे आहे, हे सांगा, ते सांगा म्हणून येतो लाडात...
मग, त्या दिवशी स्मशानातील भुतं अंगी आल्यासारखे वर्तन करून त्या गरीब, असहाय्य महिलेची आमच्या संस्थेचा रूग्णवाहिका चालक लूट करतो हे लक्षात आल्यावर का बरे फोन करून शहानिशा केली नाही. याचाच अर्थ त्याने कुठल्या तरी दीड फुट्याची पंधरा हजार रुपयात सुपारी घेतली होती.
साधा आणि सरळ, सोपा प्रश्न होता. त्या महिलेला न्याय मिळवून द्यायची तळमळ होती तर आम्हाला सांगितले असते तर अंत्यसंस्कारही
विनामूल्य करून दिले असते. रचलेल्या कटाप्रमाणे व्हिडिओ केला त्यातही काही दम नाही. तो सुद्धा त्याच्यासारखाच बिनकामाचा.
दुसऱ्याचे लंगोट बांधून पत्रकारितेचे मैदान मारता येत नाही, ते सुटतं आणि नागडे पडण्याची पाळी येते, ती दीपक घरत नावाच्या लंगोटावर आली आहे. त्याने आणि त्याच्या वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार नऊ किलोमीटरला रूग्णवाहिकेने पंधरा हजार घेतले हे सिद्ध करून दाखवावे. पनवेल ते खारघर असा चार वेळा प्रवास, दोन दिवस वेळ देऊन रुग्णवाहिका चालकाने, कुणी घराबाहेर पडत नसताना, दुकाने बंद असताना मोठ्या मेहनतीने अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य आणले. दहा हजार त्याला देण्यात आले, त्यातील पाच हजार स्मशानभूमीत लाकडांचा सौदा करायला बसला आहे, त्या चौधरीने घेतले. त्या महिलेला साडी आणि इतर सामानावर झालेल्या खर्चावर, हेतूपूर्वक लिहिण्याचे टाळले. घेतलेल्या सुपारीमुळे बुद्धी खुंटीला टांगून ठेवली होती. भाडे आकारले पंधरा हजार अशी दारूच्या फेसासारखी बातमी बनवून काहींना खुश केले. अशा टमरेल पत्रकारांकडून प्रतिष्ठान कधीच बदनाम होणार नाही. आता काही भुतं नाचू लागलीत, सगळीकडे बातमी फिरवतात... त्यांचाही योग्यवेळी समाचार घेऊ. काही भूतांचा आधीच उतारा काढलेला आहे. तरीही त्यांच्या पार्श्वभागाला दात फुटले आहेत. यापूर्वी घशातील दात घशात टाकले आहेत... आता ते दातही जिथून बाहेर आलेत तिथे टाकू.
बरं या पत्रकाराला सकाळने यापूर्वीच सेवेतून लांच्छनास्पदपणे काढून टाकले आहे. पुन्हा त्याला रोजंदारीवर घेतले, नोकरीवर नाही. मग याची विश्वासहर्ता ती काय? याची तर लाज ठेवून पत्रकारिता करायला हवी की नको. आता भोग म्हणा कर्माची फळे!
स्मशानातील भुतं स्मशानातच गाडू !
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...