धक्कादायक! नाभिकाच्या चुकीमुळे सहा जणांना झाला करोना
लॉकडाउनच्या नियमाचं उल्लघंन
मध्य प्रदेशमधील स्थानिक वर्तमानपत्रांच्या माहितीनुसार, खरगोन येथील बडगाव हेअर करिंट सलूनमध्ये केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी गेलेल्या सहा जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सलूनमधील नाभिकानं संक्रमित व्यक्तीचा कपडा आणि ब्लेड या सहा जणांना वापरल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच त्या सलूनमध्ये कटिंगसाठी आणि शेविंगसाठी गेल्यामुळे करोनाचा संसर्ग झाला.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सलूनमध्ये दाढी करायला आलेल्या व्यक्तीमुळे करोनाचा ससंर्ग झाला. त्या सलूनमध्ये ज्या नागरिकांनी दाढी आणि कटिंग केली ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांना करोना झाला. या सलूनमध्ये गेलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट पाच एप्रिल रोजी करण्यात आली. त्यापैकी १७ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर सहा जणांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
करोनाचा संसर्ग झालेल्या सहा जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले. प्रशासनानं तात्काळ गाव सॅनिटायझर करून सील केलं आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशात आतापर्यंत १,८४६ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.