ब्राझिलने घेतली पनवेलची मदत
आंतरराष्ट्रीय आयुर्वेदाचार्य डॉ. गौरव दवे यांनी दिली सेनेटरला कोरोनावर पोर्तुगीज भाषेत माहिती
पनवेल/प्रतिनिधी
कोरोना विषाणूने जगभरातील वैद्यकीय शास्त्रासह शास्त्रज्ञांनाना गरागरा फिरवले असतानाच ब्राझिलच्या सेनेटर मारा ग्राबिली यांनी पनवेलस्थित आंतरराष्ट्रीय आयुर्वेदाचार्य डॉ. गौरव दवे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या राज्यात कोरोनावर प्रतिबंधनात्मक उपाय करण्यासाठी काही माहिती आणि सुचना मागविल्या आहेत. त्याप्रमाणे डॉ. दवे यांनी त्यांना पोतुगीज भाषेत एका ब्लॉकद्वारे ही माहिती पुरविली आहे. ग्राबिली तिकडे उपाययोजना करणार असल्याचे डॉ. दवे यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दै. निर्भीड लेखशी बोलताना दिली.
कोरोनावर काही औषधोपचार सापडले नसले तरी ब्राझिलच्या सेनेटरचा आयुर्वेदावर आणि विशेषतः डॉ. गौरव दवे यांच्यावर श्रद्धापूर्वक विश्वास असल्याने त्यांनी डॉ. दवे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती घेतली आहे. हा पनवेलचा ब्राझिलने केलेला ‘गौरव’ ठरला आहे.
मारा ग्राबिली या एका भयंकर आजाराने ग्रासल्या होत्या. त्यांच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केल्यानंतरही त्यांना आराम जाणवला नव्हता. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे आंतराष्ट्रीय आयुर्वेदाचार्य डॉ. गौरव दवे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यांच्या औषधोपचाराने त्या बर्या झाल्याने त्यांचा आयुर्वेदासह डॉ. गौरव दवे यांच्यावर विश्वास बसला आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. दवे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. डॉ. दवे यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्यांनी पोतुगीज भाषेत त्यांच्या ब्लॉकवर दिलेल्या माहितीनुसार तीन हजाराहून अनेक नागरिकांनी पसंती दिली आहे.
कोण आहेत डॉ. गौरव दवे?
•दवे कुटूंब हे मुळचे गुजरातमधील राजकोटच्या खेंगाराका येथील मूळ रहिवाशी आहेत. त्यानंतर त्यांचे कुटूंब अहमदनगर जिल्ह्यातील चाळीसगाव येथे स्थलांतरित झाले. तिथून ते पुढे पुणे, मुंबई आणि त्यानंतर पनवेल येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची पाचवी पिढी आयुर्वेदात कार्यरत आहे.
•पनवेलचे आयुर्वेदाचार्य आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते भक्तीकुमार दवे यांचे बंधू ध़रणीधर दवे असलेले यांचे ते पुत्र आहेत. पनवेलच्या पायोनिअर सोसायटीमधील सहकार निवास इमारतीमध्ये ते राहतात.
•राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वैयक्तिक वैद्य राहिलेले वल्लभराम दवे हेसुद्धा त्यांचे काका आजोबा होत.
•भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे वैद्य राहिलेले अंतूभाई दवे हे डॉ. गौरव दवे यांचे काका आजोबा होत.