सकाळचा ‘झोलर पत्रकार’ दीपक घरतविरूद्ध पोलिसात गुन्हा
मृत महिलेच्या मुलींसह रूग्णवाहिका चालकाने खारघर पोलिसात नोंदविला गुन्हा
पनवेल/प्रतिनिधी
स्ट्रिंग पत्रकारितेच्या नावाखाली नसते उद्योग चालवून उपजीविका करणार्या दै. सकाळचा ‘झोलर पत्रकार’ दीपक घरत अखेर उघडा पडला आहे. कोविड परिस्थिती आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची थट्टा उडवत ‘सुपारीबाज’ पत्रकाराने खोडसाळपणा करून छापलेल्या बातमीमुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना बदनाम करत राजकीय भांडवल केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार मयत महिलेच्या दोन्ही मुलींसह रूग्णवाहिका चालकाने खारघर पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार त्याच्यविरूद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
‘रुग्णवाहिकेसाठी 15 हजार’, ‘अंत्यविधीसाठी असहायतेचा फायदा; पनवेलमधील प्रकार’ या मथळ्याखाली बातमी आजच्या दै. सकाळमध्ये झोलर पत्रकार म्हणून कुख्याती असलेल्या दीपक घरत यांनी दै. सकाळमध्ये छापली आहे. ही बातमी वाचून मृत महिलेच्या मुली चंदा पुल्लजवार आणि पूजा डुकरे यांनीच खुद्द पोलिसांत तक्रार केल्याने सकाळच्या स्ट्रिंग पत्रकारितेचे पितळ उघडे पडले आहे.
काल खारघर सेक्टर 32 ओवेपेठ येथील लक्ष्मीबाई येजलवार यांचे निधन झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुणीही मदत करायला पुढे येत नव्हते. अशात कांतीलाल प्रतिष्ठानची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रात्री 2 वाजेपर्यंत रूण्गवाहिका चालक इम्रान खान माणुसकी नात्याने त्यांच्या सोबत राहिला. मृतदेह पनवेलला आणल्यानंतर पोलिस दाखल्यासाठी पुन्हा खारघर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर तो मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवला. दुसर्यांदिवशी हिंदू संस्कृतीप्रमाणे इम्रान खान याने सर्व साहित्य खरेदी तिच्या मुलींच्या मदतीने करून अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. तरीही इम्रान खान याने मृताच्या नातेवाईकांना दमदाटी केल्याचा जावईशोध पत्रकाराने लावला आहे. त्याचे हे मुद्दे त्या मुलींनी खोडून काढले आहेत.
वस्तुस्थिती जाणीवपूर्वक टाळून सकाळने मयताच्या टाळूवरचे लोणी खात चुकीची आणि आईच्या मृत्यूपेक्षा मोठा धक्का देणारी खोडसाळ आणि बदनामीकारक बातमी छापली आहे, अशी लेखी तक्रार करून मृत महिलेच्या मुलींनीच खारघर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तर आपण या घटनेची पूर्ण माहिती देवूनही जाणीवपूर्वक घटनेचा विपर्यास्त करून सकाळने हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि कांतीलाल प्रतिष्ठानला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी झोलर पत्रकार दीपक घरत आणि बातमीला जबाबदार असणार्या संपादकांवरही गुन्हा दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालक इम्रान खान याने खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे नाहक बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावाही चंदा पुल्लजवार, पूजा डुकरे आणि रूग्णवाहिका चालक इम्रान खान करणार आहे.