शहरात आजचे नवे रूग्ण 20
....................................
एकूण रूग्ण 371, बरे झालेले रूग्ण 208, मृत्यू 16
...............................................................
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे, नवीन पनवेल, तळोजे, पनवेल (तक्का) आणि नावडे परिसरात एकूण 20 रूग्णांची आज वाढ झाली. यामुळे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 371 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैंकी आतापर्यंत 208 रूग्ण बरे होवून घरी गेले आहे. दुर्दैवाने 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
कामोठे सेक्टर 35 मधील रिद्धीसिद्धी सोसायटीतील एकाच कुटूंबातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शताब्दी हॉस्पीटलमध्ये नर्स असलेली महिला त्यांच्या कुटूंबातील हे सदस्य आहेत. ती कोरोनाबाधित आहे. सेक्टर 8 मधील शुभम कॉम्प्लेक्समधील येथील एकाच कुटूंबातील दोघांना कोविड झाला आहे. कुर्ला येथे त्यांचे कुटूंबप्रमुख कार्यरत असल्याने ते कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापासून हे सदस्य कोविडचे रूग्ण ठरले आहेत. सेक्टर 9 मधील कृष्णकुंज सोसायटीतील एकाच कुटूंबातील दोघांना लागण झाली आहे. लालबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी यांचे ते कुटूंब आहे. ते स्वतः आधी कोरोनाबाधित आहेत. सेक्टर 21 मधील सुरभी सोसायटीतील, वडाळे एसटी डेपोत उप अभियंता असलेल्या अधिकार्याला कोरोना झाला आहे. सेक्टर 10 मधील देवलिलामधील एका नागरिकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
नवीन पनवेलमधील सेक्टर 5 ए, हरि महल सोसायटीतील एकाच कुटूंबातील तिघांना कोरोना झाला आहे. कुटूंबप्रमुख कोरोनाबाधित आहे. सेक्टर 13 मधील ए-टाईप चालीतील 62 येथील व्यक्तीला कोरोना झाला आहे. त्याशिवाय अन्य एका व्यक्तीला तिथेच लागण झाली आहे. सेक्टर 16 मधील क्लासिक कल्पतरू सोसायटीमधील एका व्यक्तीला लागण झाली असून ते धारावी बेस्ट बस डेपोत निरीक्षक आहेत. पनवेल परिसरातील तक्का येथील मोराज रिव्हरसाईड पार्क, तापी येथे कोरोनाबाधित असून ते मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. तळोजे, ओवेपेठे येथील महिलेला लागण झाली आहे. हॉस्पीटलमधून त्यांना उपचार घेताना संसर्ग झाला आहे. नावडे फेज-2 मध्ये नव्याने रूग्ण आढळला आहे. देवदृष्टी सोसायटीतील तरूणाला कोरोना झाला आहे. जेएनपीटीत तो क्लिअरिंग विभागात तो कार्यरत आहे.
प्रशासन आणि सत्ताधार्यांवर नगरसेवक म्हात्रेंचे टीकास्त्र
...................................................................
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव होत असताना महापािbH$m प्रशासन आणि सत्ताधारी गट अतिशय कुचकामी ठरत असल्याचे टीकास्त्र शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी सोडले आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याकडे कानाडोळा प्रशासन करीत आहे. तर सत्ताधारी आणि प्रशासन दोघांची तोंड परस्परविरोधी असल्याचे मत म्हात्रे यांनी व्यक्त करत ते कोरोना रूग्णांची दक्षता घेत नसल्याचा आरोप केला आहे.