खारघर, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, कळंबोलीत आढळले 22 रूग्ण .

खारघर, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, कळंबोलीत आढळले 22 रूग्ण
......................................................................................
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शहरांमध्ये आज नव्याने 22 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 9 रूग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू ओढावला आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात 393 रूग्णांची नोंद झाली असून 217 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
खारघर सेक्टर 13 मधील प्राईम रोज आर्केडमधील, चेंबूर येथील जैन हॉस्पीटलमध्ये कार्यरत असेलेल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 21 मधील एकलव्य सोसायटीतील एकाच कुटूंबातील दोघांना कोविडची लागण झाली आहे. सेक्टर 15 मधील प्रियदर्शनी सोसायटीमधील स्पॅगेटी बिल्डिंगमधील एकाच कुटूंबातील तिघांना कोरोना झाला आहे. त्यांचे कुटूंबप्रमुख असलेले पोलिस उपनिरीक्षक वडाळे पोलिस ठाण्यात असून ते कोरोनाबाधित आहेत. सेक्टर 12 मधील रो हाऊस नं. 3 मधील एकाच कुटूंबातील चौघांना कोरोना संसर्ग झाला आहे. मुंबई रे रोड येथे कुटूंबप्रमुखाचा व्यवसाय आहे. ते कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यापासून लागण झाली आहे.
कामोठे सेक्टर 34 मधील मानसरोवर कॉम्प्लेक्समधील रहिवाशाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच सेक्टरमधील संस्कृती सोसायटीतील पोलिस कर्मचार्‍याला लागण झाली आहे. ते ताडदेव पोलिस दलात आहेत. सेक्टर 8 मधील दीपक सोसायटी येथील एकाच कुटूंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैंकी एक जण मुंबई येथे एचडीएफसी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक आहेत.
नवीन पनवेल येथील सेक्टर 14 मधील अमृतवेल सोसायटीतील रहिवाशी आहे. त्याला कोरोना झाला आहे. त्याची पत्नी सायन हॉस्पीटलमध्ये कार्यरत असून ती कोरोनाबाधित आहे. सेक्टर 4 मधील पुष्पवर्षा सोसायटीतील महिलेला लागण झाली आहे. त्या मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. सेक्टर 13 मधील ए टाईप 47/3 मधील इंद्रायणी सोसायटीत आणखी एका रूग्णाला कोरोना झाला आहे. बी-10/12 येथील महिलेला बाधा झाली आहे. वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी मानखुर्दला गेली होती. तिकडे लागण झाली. सेक्टर 14 मधील आमरीत सोसायटीतील तरूणाला लागण झाली आहे.
पनवेलमधील साईनगर येथील साईउद्यान सोसायटीतील रेल्वे कर्मचार्‍याला कोविड झाला आहे. लोकमान्य टिळक रेल्वे कार्यालयात ते कार्यरत आहेत. तक्का येथील मोरोज रेसिडन्सीमधील महिलेला कोविड झाला आहे. ती मुलाकडे कोपरखैरणे, नवी मुंबईत गेली होती. तिकडे लागण झाली आहे.
कळंबोली-रोडपाली येेथील सेक्टर 20 मधील सनसिटी रेवा अपार्टमेंटमधील महिलेला लागण झाली आहे. तिच्या मुलाला आधी कोरोना झाला आहे.


 


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...