उरण शतकाच्या उंबरठ्यावर


उरण शतकाच्या उंबरठ्यावर


आणखी ४४ कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ 


उरण/प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बसताना दिसतोय. कोरोनाचे दृष्ट चक्र आता शहरी भागासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे. उरणमध्ये ४४ रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.



रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९७ वर पोहचली आहे. आज नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये पनवेल मनपा १०, पनवेल ग्रामीण ०७,  उरण ४४ असा समावेश आहे. सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६७ आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेले मात्र उपचार होऊन बरे झालेले नागरिक  संख्या ११६ आहेत.  



सद्यस्थितीत दिवसातील कोरोना बाधित बरे झालेले रुग्ण ०९ असून यामध्ये पनवेल मनपा ०८, उरण ०१ असा आहे. आजवर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल मनपा ०७, पनवेल ग्रामीण ०२, पोलादपूर ०१, महाड ०३, कर्जत ०१ असा समावेश आहे.



तपासणी अंती प्रलंबित रिपोर्ट असलेल्या नागरिकांची संख्या २९ इतकी आहे. सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा १०४, पनवेल ग्रामीण ६१, उरण ९८, अलिबाग ०३, तळा ०१ अशी आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...