ओएनजीसी गेट समोरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण पूर्णत्वाकडे !
..........................................
पनवेल संघर्ष समितीची वचनपूर्ती
...........................................
पनवेल:
गेली अनेक वर्षे खड्डे आणि बारमाही साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थी यांची डोकेदुखी आणि त्यातून निर्माण होणारी तासनतास वाहतूक कोंडी दूर करताना मुंबई- गोवा मार्गावरील काळुंद्रे गावाजवळील ओएनजीसी गेट समोरील रस्त्याचे सुरुवातीला डांबरीकरण करून घेताना नागरिकांना दिलेल्या कॉंक्रीटीकरण रस्त्याची ग्वाही पूर्ण करत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी ते काम पूर्णत्वाकडे नेले आहे. त्यामुळे प्रवाशांची कायमची डोकेदुखी गेली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन अतिशय गंभीर प्रश्न कांतीलाल कडू यांनी मोठ्या जिद्दीने मार्गी लावला आहे. रेल्वे पुलाखाली भयावह स्थिती गेली अनेक वर्षे झाली होती. वाहतूक पोलिस, महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रवासी, सगळेच या समस्येमुळे चिंतेत होते.
कडू यांनी सामाजिक व्यथा दूर करण्याचा विडा उचलून हाती घेतलेल्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण करताना जीर्ण झालेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर तिथे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा दिला. ते काम पूर्ण होताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडत पनवेल संघर्ष समितीला मनापासून धन्यवाद देत कॉंक्रीटीकरण करण्याची मागणी केली होता. तीन महिन्यात त्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द कडू यांना दिला होता. मार्च महिन्यात हे काम करायचे होते. सुरुवातही केली होती. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल म्हणून ते थांबविले होते. त्यानंतर लॉकडाऊन आले. आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या कामानुसार हे कॉंक्रीटचे काम सुरू करून पूर्णत्वाकडे झुकले आहे. साई कन्स्ट्रक्शनचे मालक जयदीप गिरासे हे ठेकेदार आहेत. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सर्व अधिकारी आणि इतर आस्थापना अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने ही कायमची डोकेदुखी गेल्याने कडू यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Attachments area