गुडवणवाडीमध्ये पाण्याच्या ‘बोरिंग’वरून हाणामारी 


गुडवणवाडीमध्ये पाण्याच्या ‘बोरिंग’वरून हाणामारी 



५ जण जखमी;  १७ जणांवर गुन्हा दाखल


 कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गुडवणवाडीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. त्यातच बोअरवेलचा हातपंप कुणीतरी तोडला होता. याबाबत सरपंचांना मोबाईलमध्ये फोटो काढून माहिती दिली. बोअरवेलची माहिती दिल्याबद्दल १७ लोकांच्या जमावाने पाच तरुणांना मारहाण करण्याची घटना घडली. दरम्यान, कर्जत पोलिस ठाण्यात १७ व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून पाच जखमींवर कशेळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायतीमधील  गुडवणवाडीमध्ये उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाई सुरू होते. त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेल पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई नाही. मात्र कुणीतरी बोअरवेलचा हातपंप मंगळवारी (ता. १२) तोडला. त्याबद्दल वाडीमधील फोटो काढून बोरिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच वृषाली क्षीरसागर यांना कळविले. मात्र, हातपंप कुणी तोडला आणि फोटो कुणी काढले याची कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना केवळ संशयावरून अनंता रामा पुंजारा यांच्या घरात घुसून १७ लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच अनंता पुंजारा यांना सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या सागर निर्गुडा, रोहिदास पुंजारा, पद्ममाकर पुंजारा,पंढरीनाथ निर्गुडे आणि काशीनाथ निर्गुडे यांनादेखील लाठी, काठ्या, लोखंडी सळई आणि कोयत्याने मारहाण केली.



याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात सुरेश खंडवी, वासुदेव खंडवी, दीपक खंडवी, नयन खंडवी, लक्ष्मण खंडवी, अनंता खंडवी, कमलाकर खंडवी, जगदीश पारधी, नरेश खंडवी, किरण खंडवी, मोहन पारधी, धनेश पारधी, मंगळ निर्गुडा, विजय निर्गुडा, हरिष खंडवी आणि सखाराम पारधी अशा १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण भोर व सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...