रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ३५२ नवे रुग्ण, सात जणांचा करोनामुळे मृत्यू
३८३ जण कोरोनामुक्त
अलिबाग: रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १७) ३५२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३८३ जण कोरोनामुक्त झाले. सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सध्या ३ हजार ५०१ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ५ हजार ८५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ६१२ वर पोहोचली आहे. ७८८ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात ३५२ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १४५, पनवेल ग्रामिणमधील ३४, उरण मधील ३१, खालापूर २३, कर्जत ४, पेण ३९, अलिबाग ५७, मुरुड १४, रोहा २, श्रीवर्धन १, महाड १ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत १, उरण २, खालापूर २, अलिबाग १, पोलादपूर १, अशा तब्बल ७ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ३२ हजार ३५२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५०१ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४३२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४८४, उरण मधील १७३, खालापूर २८४, कर्जत ११७, पेण ३८४, अलिबाग ३११, मुरुड ५६, माणगाव ५५, तळा येथील २, रोहा ७०, सुधागड १, श्रीवर्धन ३५, म्हसळा ४८, महाड ४१, पोलादपूर मधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६१ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.