कर्जत नगरपरिषदेतर्फे विनामास्क फिरणार्‍यांना मास्कचे वाटप

कर्जत:
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढू लागली असून आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.तरी अजूनही काही नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत. त्यांना जागरूक करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने मास्कचे वाटप केले.
   कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत आहे.शासन आणि स्थानिक प्रशासन वेळोवेळी खबरदारीचा सूचना देत आहेत.तरीही अजून काही नागरिक विनामास्क फिरत आहेत.शहरातील बरेच दुकानदार विनामास्क व्यापार करत आहेत.त्यांच्यात जागरूकता करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने सर्वांना मास्क देण्याचा उपक्रम केला.शहरातील विविध भागात कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील,तसेच बांधकाम समिती सभापती स्वामिनी मांजरे,नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे नगरपरिषद आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांनी पालिकेच्या कर्मचारी वर्गासह  बाजारपेठ परिसरात फिरून मास्क न लावता बाजारपेठ मध्ये फिरणाऱ्या नागरिकांना मास्क देऊन आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश दिला. मास्क, सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे हे कसे गरजेचे आहे ते पटवून दिले.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...