पांढर्‍या सोन्याने आले सुगीचे दिवस

कार्लेतील शेतकर्‍याची कमाल; दोन एकरात ४० खंडी उत्पादन

अलिबाग/प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील बळीराजाचे पांढरे सोने म्हणून नावारुपास आलेल्या पांढर्‍या कांद्यामुळे शेतकर्‍यांना दिवस दिसू लागले आहेत. कार्ले येथील प्रगतशील शेतकरी सतिश म्हात्रे आणि परिवार यांनी पांढर्‍या कांद्यांच्या उत्पादनात २ एकर शेतीत ४० खंडी उत्पादन घेतले आहे. यामुळे स्थानिक महिला वर्गाला रोजगार मिळत आहे.

पांढर्‍या कांद्याची लावणी, बेणणी, काढणी व शेवटचा टप्प म्हणजे पांढरा कांदा माळा बांधणी, पांढर्‍या कांद्याची लावणी नोव्हेंबर महिन्यात होते. साधारण ७५ दिवसात पांढरा कांदा बाजारात येतो.
या वर्षात पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेण्यात पोषक हवामान मिळालेे. पांढरा कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेता यावे, याकरिता अलिबाग तालुका व जिल्हा कृषी अधिकार्‍यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. तसेच रोहा येथील शास्त्रज्ञ जितेंद्र कदम व सृष्टी ऍग्रोचे प्रधान आदींचे सहकार्य लाभले. म्हणजे पांढर्‍या कांद्यात महाराष्ट्र राज्यात व देश पातळीवर नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे.
महत्वाचे म्हणजे पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेताना लावणी, बेणणी, काढणी, माळा बांधणे या करिता बी-बियाणे, खते औषध फवारणी, पाणी पुरवठा, मंजूर वर्ग या करिता दोन ते अडीच लाख रुपये एवढा खर्च येतो निव्वळ नफा दोन ते तीन लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.
सतिश म्हात्रे यांना रायगड भूषण जिल्हास्तरीय पुरस्कार व कृषक महोत्सव आवास व जिल्हा कृषी महोत्सव, कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मार्केटचे गणित समजणे गरजेचे आहे. बाजारातील चढउतार तसेच गडगडल्यावर सर्व शेतकरी वर्गाने संघटित होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे शेतीला पुरक असे उत्पादने घेणे काळाची गरज आहे.
-सतिश म्हात्रे, शेतकरी

तीन महिने रोजगार
पांढर्‍या कांद्याचे मार्केट रायगड, पुणे, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी अश्या विविध स्थरातून मागणी वाढत आहे. पांढर्‍या काद्याच्या उत्पादनास अनेक महिलांना ३ महिने रोजगार मिळत असल्याने महिला समाधान व्यक्त केले आहे

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...