कर्नाळा बँकः आरोपींच्या अटकेची वाजू लागली घंटा
८३ पैकी १८ मुख्य आरोपी जात्यात, अन्य सुपात!
अटकपूर्व जामिनासाठी अभिजित पाटलांचा पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल
मुख्य व्यवस्थापक अपर्णा वडकेंसह नातेवाईकांवर दिड कोटींच्या कर्जाची खिरापत
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
३८ हजारांहून अधिक शेकापचे कार्यकर्ते असलेल्या ठेवीदारांचा केसाने गळा कापत ५५० कोटी रुपयांचा कर्नाळा बँक घोटाळा उघडकीस येवून तीन वर्षे लोटली. त्यानंतर आता आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा शेकाप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य व्यवस्थापक अपर्णा वडके यांना अटक होताच माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे सुपुत्र आणि संचालक अभिजित पाटील यांच्या अटकेचे वारे वाहू लागले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
बँकेच्या मुख्य व्यवस्थापक अपर्णा सुहास वडके यांच्या अटकेनंतर ८३ आरोपींपैकी १८ आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यातील संचालकांपैंकी चौघांचे निधन झाले आहे. त्यामध्ये पुंडलिक आत्माराम म्हात्रे, रजनीकांत नटवरलाल शाह, बाळनाथ सीताराम म्हात्रे व सदाशिव तुकाराम साबळे यांचा समावेश आहे.
अटकेची टांगती तलवार असलेले आरोपीः
* सुभाष मधुकर देशपांडे
* विष्णू चिंतू म्हात्रे
* भालचंद्र रामभाऊ तांबोळी
* अरिफ युसुफ दाखवे
* सुनील मोरेश्वर मोरे
* रामचंद्र धोंडू पाटील
* अभिजित विवेकानंद पाटील
* धर्मराज उंदू नाईक
* मच्ंिछद्र कृष्णा नाईक
* गणेश सोमा सावंत
* रवींद्र गेणबा कांबळे
* रवींद्र श्रावण चोरगे
* सदाशिव महादू वाघ
* अजय तुकाराम बहिरा
* शालिनी शंकर ठाणगे
* पूनम प्रकाश वाजेकर
* ज्योती नंदू कापसे
* हेमंत मुरलीधर सुताने
अटकपूर्व जामिन अर्जावर ३ मे रोजी सरकारी पक्षाची सुनावणी
कर्नाळा बँकेचे मुख्य आरोपी विवेकानंद शंकर पाटील हे ईडी कोर्टाच्या आदेशाने तळोजा कारागृहात आहेत. काल, दुसर्या आरोपी अपर्णा वडके यांना सीआयडीने अटक करताच, बँकेचे संचालक आणि विवेकानंद पाटील यांचे सुपुत्र अभिजित पाटील यांच्या अटकपूर्व जामिनासाठी पनवेल सत्र उपजिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर आज अर्ज आला होता. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. वाय. एस. भोपी यांनी युक्तिवाद करुन सरकारी पक्षाच्या युक्तिवादाकरिता ३ मे रोजीची तारीख मागण्यात आली. तर आरोपींच्या वतीने ऍड. मानसी म्हात्रे यांनी, आपण सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर म्हणणे मांडू असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पाटलांच्या अटकपूर्व जामिनावर आज अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
फिर्यादीः
उमेश गोपिनाथ तुपे
(जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग -१, सहकारी संस्था, अलिबाग. रायगड)
आतापर्यंतचे तपास अधिकारी
शत्रुघ्न माळी(पोलिस निरीक्षक व प्रशासन,
पनवेल शहर पोलिस स्टेशन)
सतीश गोवेकर
(सहाय्यक पोलिस आयुक्त,
गुन्हे शाखा, नवी मुंबई)
विजय वाघमारे
(वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
आर्थिक शाखा, नवी मुंबई)
श्रीमती आर. जे. सरवदे
(पोलिस उपअधिक्षका, आर्थिक गुन्हे शाखा,
राज्य गुप्त वार्ता विभाग, पुणे)
श्रीमती एम. एस. जगताप
(पोलिस उपअधिक्षका, आर्थिक गुन्हे शाखा,
राज्य गुप्त वार्ता विभाग, पुणे)