तळोजा कारागृहात सतिश गावंडची रवानगी

तळोजा कारागृहात

सतिश गावंडची रवानगी 

उरण चिट फंडातील मुख्य आरोपीचा पहिल्या गुन्ह्यातील जामीन रद्द 


उरण/निर्भीड लेख वृत्त

बहुचर्चित 400 कोटींच्या उरण चिट फंडातील मुख्य आरोपी असलेल्या सतिश गावंड याला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातून पहिल्या गुन्ह्यात वर्ग करून पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. आधीच्या महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण व हक्क कायद्यातंर्गत गुन्ह्यात पोलिसांनी दुसर्‍यांदा अटक  केली होती. न्यायालयाने आज त्याचा जामीन रद्द केला. त्यानंतर तळोजा कारागृहात त्याची रवानगी केली. 

सतिश गावंड याच्यावर पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.त्याला उरण पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती. नाकाबंदीत पकडलेल्या सतिश गावंडला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतले होते. शिवाय दहा कोटींची रोकडही जप्त केली होती. त्यानंतर उरण परिसरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. 

पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून अटक केल्याची चर्चाही पिकली होती. सतिश गावंड देव असल्याचा काहींनी कांगावा केला होता. पुढे त्याचे खरे रूप समोर आले आणि गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडल्याचे सिद्ध झाले.

दरम्यानच्या काळात त्याची महिला साथीदार सुप्रिया पाटील गोळीबार प्रकरण समोर आले आणि या प्रकरणाचा गुंता वाढला. त्यानंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आणि सतिश गावंड याला न्या. जयराज वढाणे यांनी जामीनावर मुक्त केले. ती संधी साधून सतिश गावंड थेट मध्य प्रदेशला पळून गेला. तिकडून त्याने ‘व्हिडीओ वॉर’ सुरु केले आणि पोलिसांनी त्याला सीबीडी बेलापूर येथे दाखल झालेल्या दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली. त्या गुन्ह्याचा तपास आणि पोलिस कोठडीची मुदत संपुष्टात येताच गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला उरणच्या पहिल्या गुन्ह्यात अटक केली.

आज, दुपारी न्या. जयराज वढाणे  यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीन देताना घालून अटी व शर्थीचा भंग केल्याप्रकरणी त्याचा जामीन रद्द केला. त्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली.याप्रकरणी सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी सरकारच्या वतीने कामकाज पाहिले.


वकिलाच्या घरातून रोकड वसुल

उरण चिड फंडातील दुसरी आरोपी सुप्रिया पाटील हिचा साथीदार असलेला कोप्रोली येथील स्वप्नील म्हात्रे उर्फ बंटी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीवरून अमर पाटील नावाच्या वकिलांकडे त्याने ठेवायला दिलेली 21 लाखाची रोकड वकिलांच्या घरून पोलिसांनी हस्तगत केली असून ती रोकड चिटफंड गुन्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे. न्यायालयाने पुन्हा आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.


Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...