विमानतळ नामकरणावर पुन्हा चर्चेचे गुर्हाळ?
कृती समितीची 20 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता बैठक
पनवेल/निर्भीड लेख वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार असताना जंगी मोर्चे काढले गेले होते. परंतु, महायुती सरकारने हा प्रस्ताव लोंबकळत ठेवूनही सर्वपक्षीय कृती समिती बैठकांवर बैठका घेवून चर्चेचे गुर्हाळ सुरु ठेवून वेळ मारून नेत आहे. आता येत्या 20 नोव्हेंबरला पनवेल-उरण आगरी समाज सभागृहात दुपारी 4 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी बैठक बोलाविली आहे. ते सातत्याने पाठपुरावा करीत असले तरी समितीमध्ये असलेल्या भाजपा समर्थकांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे नामकरणाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपा पुरस्कृत सरकारे असूनही लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा तिढा सुटत नाही, ही आगरी समाजाचे रक्त गोठवणारी कृती ठरत आहे. राज्यात ठाकरे यांच्या महाआघाडीचे सरकार असताना मानवी साखळी, आंदोलने करून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडले होते.
मात्र, भाजपा महायुती सरकार आल्यानंतर केवळ आश्वासनांवर नेत्यांची चूल पेटत असून लोकनेते दिबांच्या नावाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यावर ठोस निर्णय न घेतल्यास सर्वपक्षीय कृती समितीची कृतीच संशयाच्या फेर्यात सापडेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
या बैठकीत सिडको, गावठाण विस्तार, नवी मुंबईतील बैठकीचा आढावा, औद्योगिक आणि एमआयडीसी जमिनी संदर्भात नेहमीप्रमाणे चर्चा होणार असली तर विमानतळ नामकरणावर चर्चेचे गुर्हाळ कायम राहिल्यास, नेत्यांना मिठाच्या गुळण्या कराव्या लागतात हेसुद्धा सिद्ध होणार आहे.
जे. एम. म्हात्रे यांच्या नावाला बगल