पनवेलमध्ये भाजपाला उतरंडी!

पनवेलमध्ये भाजपाला उतरंडी!

मतदारांनी दोन्ही आमदारांना दाखविले ‘आस्मान’ 

पनवेल/निर्भीड लेख वृत्त

 राज्यात मोठ्या भावाच्या थाटात भाजपा असली तरी पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला अनेक ठिकाणी मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येत आहे. 17 पैकी 11 ग्रामपंचायती शेकाप महाआघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ घडवूनही पनवेल तालुक्यातील मतदारांनी जणू आमदार प्रशांत ठाकूरांच्या ‘अकार्यक्षमतेचा निकाल’ ग्रामपंचायत निवडणुकीतून दिला आहे. 

पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. 05) शांततेत मतदान झाले. आज, सोमवारी (ता. 06) सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालय पनवेल येथे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत शेकाप, महाविकास आघाडी 9 जागा, ग्रामविकास आघाडी 2 जागा, तर भाजपाला केवळ 6 जागांवर विजय मिळवता आला. 

तुराडे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या रंजना विश्‍वनाथ गायकवाड यांनी विजय मिळविला. तर दापोली ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या निकिता समाधान घोपरकर विजयी झाल्या. तसेच, चिखले ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या दीपाली दत्तात्रेय तांडेल यांनी विजय मिळवत सर्वच पक्षांना धोबीपछाड दिला.

वावेघर सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या गीतांजली गुरुनाथ दातांडे, कोनच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या अश्‍विनी जितेश शिसवे, गुळसुंदे सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मिनाक्षी भास्कर जगताप, वाघिवली ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापचे अनिल बाळाराम पाटील, दुंदरे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापचे सुभाषशेठ भोपी, गिरवले ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश चंद्रकांत हातमोडे, कसळखंड ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत संजय नारायण घरत हे विजयी झाले.

तर विचुंबे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रमोद शांताराम भिंगारकर, ओवळे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत रुपेश सुरेश गायकवाड, भिंगार ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत गुलाब रामदास वाघमारे, देवद ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत विनोद बाबू वाघमारे, सोमाटणे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत तेजस्विनी आत्माराम पाटील, न्हावे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजेंद्र गणेश पाटील, मालगुंडे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत सीताराम जानू चौधरी हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले.

Featured Post

विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक

विवेकानंद पाटलांच्या  ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक   कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका   पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...